VIDEO | क्षणात होत्याचं नव्हतं, बारा प्रवाशांसह निघालेली नाव बघता-बघता उलटली, पाच दिवसांनी चिमुरड्याचा मृतदेह सापडला

26 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून तेहंगूर येथे भंडाऱ्यानिमित्त गेले होते. परत येताना सिंध नदीत त्यांची बोट उलटली.

VIDEO | क्षणात होत्याचं नव्हतं, बारा प्रवाशांसह निघालेली नाव बघता-बघता उलटली, पाच दिवसांनी चिमुरड्याचा मृतदेह सापडला
बोट उलटून भीषण अपघात
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:46 AM

भोपाळ : नदीत बोट उलटून झालेल्या अपघाताला (Boat Accident) जवळपास पाच दिवस उलटल्यानंतर दहा वर्षांच्या बालकाचा मृतदेह हाती आला आहे. 12 प्रवाशांसह निघालेली नाव 26 जानेवारीला रात्री बारा वाजताच्या सुमारास सिंध नदीत उलटून मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भीषण अपघात झाला होता. बोटीतून प्रवास करणाऱ्या 10 जणांचे प्राण ग्रामस्थांनी वाचवले होते. मात्र दहा वर्षांचा मुलगा आणि 16 वर्षांची बालिका बेपत्ता होते. यापैकी चिमुरड्याचा मृतदेह सापडला आहे, मात्र अल्पवयीन मुलीचा शोध अद्यापही लागलेला नाही. अपघाताला जवळपास पाच दिवस उलटल्यामुळे तिला पाण्यात बुडून जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीत अजूनही शोधकार्य सुरु आहे. बेपत्ता मुलीचे कुटुंबीय तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशात भिंडमधील नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेहंगूरची आहे. 26 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून तेहंगूर येथे भंडाऱ्यानिमित्त गेले होते. परत येताना सिंध नदीत त्यांची बोट उलटली. बोटीत 12 जण होते. त्यापैकी 10 जणांना ग्रामस्थांनी वाचवून सुखरूप वाचवले.

पाहा व्हिडीओ :

पाच दिवसांनी चिमुरड्याचा मृतदेह सापडला

इतर दोघा जणांपैकी 10 वर्षीय ओमचा मृतदेह आज सापडला. 16 वर्षीय द्रौपदीचा अद्याप शोध लागलेला नाही. होमगार्ड आणि एसडीआरएफची टीम बेपत्ता मुलीचा शोध घेत बचावकार्य सुरुच ठेवत आहेत.

संबंधित बातम्या :

रत्नागिरीतील बेपत्ता मच्छिमारी बोटीचं रहस्य दीड महिन्याने उलगडलं, समुद्राच्या तळाशी अवशेष

VIDEO | धबधब्याखाली आडोसा, 11 जणांना जलसमाधी देणाऱ्या अमरावती बोट दुर्घटनेपूर्वीचा व्हिडीओ समोर

नंदूरबारमध्ये सहलीला आलेल्या 13 पर्यटकांची बोट उलटली, तिघांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.