मध्य प्रदेश : चेटकीणीच्या संशयावरुन काकुची हत्या, तलवारीने गळा चिरला

मध्य प्रदेशातील मंदसौर (Mandsaur Women Murder) येथे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चेटकीण असल्याच्या संशयावरुन पुतण्याने आपल्या काकुची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुतण्या आणि काकुमध्ये कुठल्यातरी कारणावरुन वाद झाला. ही वाद इतक्या विकोपाला गेला की संतापलेल्या पुतण्याने घरातून थेट तलवार आणली.

मध्य प्रदेश : चेटकीणीच्या संशयावरुन काकुची हत्या, तलवारीने गळा चिरला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 9:38 AM

भोपाळ : मध्य प्रदेशातील मंदसौर (Mandsaur Women Murder) येथे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चेटकीण असल्याच्या संशयावरुन पुतण्याने आपल्या काकुची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुतण्या आणि काकुमध्ये कुठल्यातरी कारणावरुन वाद झाला. ही वाद इतक्या विकोपाला गेला की संतापलेल्या पुतण्याने घरातून थेट तलवार आणली. पाहताच त्याने तिची मान कापली आणि काकुचा खून केला. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. असे सांगितले जात आहे की काकुची हत्या केल्यानंतर आरोपी पुतण्या घटनास्थळावरुन पळून गेला.

मंदसौरचे टीआय सूर्यवंशी यांनी दिलेल्या, प्राथमिक तपासात महिलेच्या हत्येच्या प्रकरणात दोन गोष्टी बाहेर येत आहेत. 20 वर्षीय पुतण्या विष्णूला त्याच्या काकुवर चेटकीण असल्याचा संशय होता. या कारणास्तव त्याने काकुचा खून केला. त्याचबरोबर अनेक जण याला जमिनीचा वादही म्हणत आहेत. त्याचबरोबर पोलीस आता या प्रकरणाचा दोन्ही दृष्टीने तपास करत आहेत. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, कुटुंबात जमिनीचा वाद सुरु होता. याच मुद्द्यावरुन काकू आणि पुतण्यामध्ये बाचाबाची झाली. मात्र, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

चेटकीणीच्या संशयावरुन काकुची हत्या

मृत महिलेच्या मुलाचे म्हणणे आहे की जेव्हा त्याच्या आईशी वाद झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मध्ये येऊ दिले नाही. इतक्यात विष्णू तलवार घेऊन आला आणि त्याच्या आईची मान कापली. त्याच्यासमोरच त्याच्या आईने तडफून तडफून प्राण सोडले. त्याने आईला वाचवण्यासाठी आरडाओरडाही केला. लोक तेथे पोहोचले मात्र त्यांना वाचवता आले नाही.

मृत महिलेचा एक नातेवाईक सांगतो की, आरोपी विष्णू आणि त्याचे कुटुंब आई आणि मुलगा दोघांना मारण्यासाठी त्यांना ओढत होते. त्याने सांगितले की, आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलालाही मारणार होते पण नंतर त्यांनी त्याला वाचवले. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे संबंधिताचे म्हणणे आहे. हत्येनंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पण या दरम्यान, पीडित कुटुंबाने मृतदेह मध्य रस्त्यावर ठेवून गोंधळ घातला. आरोपींना अटक करण्याच्या मागणीवर मृत महिलेचे नातेवाईक ठाम आहेत.

संबंधित बातम्या :

आई-बाबांचा रोष पत्कारत लव्हमॅरेज केलं, पण लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या

ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.