नाशिक-पुणे महामार्गावर धावती दुचाकी पेटली, चालकाचा भाजून मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर धावती दुचाकी पेटली, चालकाचा भाजून मृत्यू
नाशिकमध्ये बाईक पेटून अपघात
Image Credit source: टीव्ही 9

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरच्या गुरेवाडी फाट्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. भीमा संतु कापडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उमेश पारीक

| Edited By: अनिश बेंद्रे

May 12, 2022 | 10:50 AM

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर धावती दुचाकी पेटून अपघात (Bike Accident) झाला. यामध्ये बाईक चालकाचा भाजून मृत्यू (Burnt) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik Accident) सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. भीमा संतु कापडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरच्या गुरेवाडी फाट्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या अपघात दुचाकीस्वार 90 टक्के भाजला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बघता-बघता गाडी पेटली

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील भीमा संतू कापडी (वय 41 वर्ष) असे मयत दुचाकी चालकाचे नाव आहे. सिन्नरच्या दिशेने जात असताना अचानक गाडीने पेट घेतला.

कापडी यांना काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत भीमा कापडी हे गंभीररीत्या भाजले. मात्र 90 टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात ही आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

नाशिक-पुणे महामार्गावर गाडी पेटण्याचं सत्र

दरम्यान, सिन्नर येथील नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात काही दिवसांपूर्वी बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला होता. कार चालकाने प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या कडेला घेत कारमधून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले.

कार नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटात अचानक कारच्या इंजिनने पेट घेतला. बघता बघता आग वाढल्याने चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला घेत कारमधून बाहेर पडला.

हे सुद्धा वाचा

घटनेची माहिती माळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र, आगीने पूर्ण कारला वेढा दिल्याने काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें