VIDEO | औरंगाबादमध्ये भररस्त्यात पोलिसांची तरुणाला मारहाण, खुनाचा आरोपी असल्याचा संशय

एका व्यक्तीला पकडल्यानंतर रस्त्यात पोलिसांचं वाहन उभं करण्यात आलं. त्या वाहनाला टेकून संबंधित व्यक्तीला उभं करण्यात आलं. त्याच्या भोवती वर्दीतील पाच ते सहा पोलिसांनी रिंगण केलं, असं व्हिडीओमध्ये दिसतं

VIDEO | औरंगाबादमध्ये भररस्त्यात पोलिसांची तरुणाला मारहाण, खुनाचा आरोपी असल्याचा संशय
औरंगाबादमध्ये पोलिसांची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद : भर रस्त्यात उभं करुन पोलिसांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्ती खुनातील संशयित आरोपी असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

एका व्यक्तीला पकडल्यानंतर रस्त्यात पोलिसांचं वाहन उभं करण्यात आलं. त्या वाहनाला टेकून संबंधित व्यक्तीला उभं करण्यात आलं. त्याच्या भोवती वर्दीतील पाच ते सहा पोलिसांनी रिंगण केलं. त्यानंतर पोलिसांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांच्या शॉर्ट लाठीने त्या व्यक्तीला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. लाल रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली ही व्यक्ती सिव्हील ड्रेसमध्ये असलेला पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

व्हिडीओविषयी पोलीस काय सांगतात?

औरंगाबादमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यावरच हा प्रकार घडला. ही सर्व घटना उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 8 ऑगस्ट रोजी औरंगाबादमधील पुंडलिकनगर भागात चित्रित केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मार खाणारी व्यक्ती ही खुनातील संशयित आरोपी असल्याचे देखील समोर येत आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Aurangabad | कारला धक्का लागल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडून रिक्षाचालकाला मारहाण

औरंगाबादमध्ये पोलीस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू, उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील घटना

Published On - 8:38 am, Thu, 19 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI