Parbhani Suicide | अधिकारी होण्याचे स्वप्न, शिपाई पदावर काम करताना घुसमट, 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

किशन ढगे हा भोगाव (ता. पालम, जि. परभणी) येथील रहिवासी होता. मागील 10 वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या स्पर्धेत येणारे अपयश, स्पर्धा परीक्षांमध्ये सतत होणारे घोटाळे उघडकीस येत असल्याने तो निराश झाला होता.

Parbhani Suicide | अधिकारी होण्याचे स्वप्न, शिपाई पदावर काम करताना घुसमट, 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या
मयत किशन ढगेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:37 AM

परभणी : स्पर्धा परीक्षांमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. परभणी जिल्ह्यात (Parabhani Crime) पालम तालुक्यातील भोगाव येथे हा प्रकार घडला. किशन घनश्याम ढगे असं मयत तरुणाचं नाव आहे. नैराश्य, आर्थिक अडचण यावर मात करत, मोठ्या पदावर काम करण्याचे स्वप्न असूनही शिपाई पदावर काम करताना होणारी घुसमट, या कारणाने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील नागझरी येथे गळफास घेत त्याने जीवनयात्रा संपवली.

काय आहे प्रकरण?

किशन ढगे हा भोगाव (ता. पालम, जि. परभणी) येथील रहिवासी होता. मागील 10 वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या स्पर्धेत येणारे अपयश, स्पर्धा परीक्षांमध्ये सतत होणारे घोटाळे उघडकीस येत असल्याने तो निराश झाला होता.

आत्महत्येचं कारण काय?

मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न असूनही त्याला शिपाई पदावर काम करताना अपमान वाटायचा. त्यामुळे तो नैराश्यात सापडला. यातच घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. शिक्षणासाठी बँक आणि खासगी लोकांकडून घेतलेले कर्ज फेडताना त्याची दमछाक होत होती. या कारणाने कंटाळून अखेर त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचा दावा केला जात आहे.

नैराश्यातून टोकाचं पाऊल

सध्या तो नागझरी (जि. वर्धा) येथे शिपाई म्हणून कार्यरत होता. ती नोकरी करत असतानाच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन उच्च पदावर जाण्याचा त्याचा मानस होता. त्याच्या बरोबरीचे गावाकडील मित्र स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन मोठ्या पदावर पोचले होते. त्यामुळे निराशेने ग्रासले होते. त्यामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला

सहकाऱ्यांमध्ये हळहळ

पशुवैद्यकीय दवाखानामध्ये कार्यरत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पार्थिवावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी किसन ढगेच्या आत्महत्येबद्दल ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे.

पाहा तुपकरांचे ट्वीट

संबंधित बातम्या :

एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, मुंबईवरुन परतलेल्या कर्मचाऱ्याची हिंगोलीत आत्महत्या

सततच्या आजारपणाचा वैताग, अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं टोकाचं पाऊल

प्रेयसीच्या आईने खडसावलं, बदनामीच्या भीतीने 21 वर्षीय प्रियकराची आत्महत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.