30 लाखाचे सावकारी कर्ज, 61 लाखाची वसुली, 13 गुंठ्याच्या प्लॉटची मागणी, सांगलीत पितापुत्र अटकेत

धुमाळ पितापुत्रांनी म्हैसाळ येथील अशोक कोरवी यांना 30 लाखाचा धनादेश दिला होता. त्या बदल्यात महिन्याला 7 टक्के व्याजाने 2 लाख 10 हजार रुपये वसूल केले होते. तसेच स्थानिक कर्जदार म्हणून महिन्याला आणखी 2 लाख रुपयांची मागणी करून 25 लाख रुपयांचा धनादेश घेतला होता.

30 लाखाचे सावकारी कर्ज, 61 लाखाची वसुली, 13 गुंठ्याच्या प्लॉटची मागणी, सांगलीत पितापुत्र अटकेत
सावकारी करणाऱ्या बापलेकाला अटक
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 9:34 AM

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये 30 लाखाचे सावकारी कर्ज देऊन त्या मोबदल्यात 7 टक्के व्याजाने महिन्याला 2 लाख रुपये घेतले. 61 लाखाची वसुली केल्यानंतरही आणखी 50 लाख आणि प्लॉट नावावर करण्यासाठी धमकावल्याने पोलिसांनी सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ आणि त्यांचा मुलगा आशिष शैलेश धुमाळ यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

धुमाळ पितापुत्रांनी म्हैसाळ येथील अशोक कोरवी यांना 30 लाखाचा धनादेश दिला होता. त्या बदल्यात महिन्याला 7 टक्के व्याजाने 2 लाख 10 हजार रुपये वसूल केले होते. तसेच स्थानिक कर्जदार म्हणून महिन्याला आणखी 2 लाख रुपयांची मागणी करून 25 लाख रुपयांचा धनादेश घेतला होता.

आणखी 50 लाखाची मागणी, प्लॉटसाठीही तगादा

30 लाख रुपयांच्या कर्जापोटी 61 लाख रुपयांची वसुली करून देखील धुमाळ पितापुत्रांकडून कोरवी यांना धमकावून त्यांच्याकडे आणखी 50 लाखाची मागणी केली जात होती. तसंच त्यांचा म्हैसाळ येथील 13 गुंठ्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावला जात होता. त्यामुळे कोरवी यांनी सावकारी सेलकडे तक्रार केली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तयार करून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी 2 लाख 60 हजार रोख रक्कम, कोरे धनादेश आणि वाहने जप्त करण्यात आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात चोरीच्या पैशातून सावकारी

दुसरीकडे, पुण्यात चोरीच्या पैशातून सावकारी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. लखन अशोक जेटीथोर असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले, सुरेश नारायण जाधव यांना देखील अटक करण्यात आली आहे.

घरफोड्या करून त्याने लाखो रुपयांची माया जमवली होती. त्या चोरीच्या पैशांतून त्याने चक्क सावकारी व्यवसाय सुरू केला होता. या अट्टल चोरट्याचा माग काढून चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

चायनिजची गाडी चालवून बंद घरं शोधायची, घरफोडीतून 77 लाखांची माया, पुण्यात अट्टल चोरटा जेरबंद

सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.