पंचवटीत आढळून आलेल्या मृतदेहामागील कारण समोर आल्यानं उडाली खळबळ, मर्डर मिस्ट्री ऐकून धक्काच बसेल

ऋषिकेश याच्या तोंडाला मार लागल्याने आणि रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता, त्यावेळी दोघेही अल्पवयीन मुले पळून गेले होते. मानवी कौशल्याच्या आधारे पोलीसांनी या खुनाच्या घटनेची उकल केली आहे.

पंचवटीत आढळून आलेल्या मृतदेहामागील कारण समोर आल्यानं उडाली खळबळ, मर्डर मिस्ट्री ऐकून धक्काच बसेल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 12:00 PM

नाशिक : मागील आठवड्यात पंचवटी एका मृतदेह आढळून आला होता. पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन तपास सुरू केला होता. मृतदेहाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान नाशिकच्या पंचवटी पोलिसांसमोर होते. मात्र, ओळख पटविण्याबरोबर खुनाची उकल करणे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र पंचवटी पोलीसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून धक्कादायक बाब म्हणजे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सातपुर येथील राहणाऱ्या 19 वर्षीय ऋषिकेश दिनकर भालेराव याचा खून झाल्याचे उघड झाले आहे. क्षुल्लक कारणावरून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. तो सातपुर मधील एका कंपनीत कंत्राटी कामगार होता. विविध प्रकारच्या तो व्यसनेच्या आहारी गेला होता. त्यामध्ये त्याच्या दोन मित्रांना त्याने पंचवटी सोडण्यासाठी सांगितले त्याला मखमलाबाद परिसरात पाटाजवळ सोडले, याच वेळी दारूसाठी पैशाची मागणी सुरू केली होती. त्यादरम्यान ऋषिकेश याने दोघा अल्पवयीन मुलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, यामध्ये एकाला मारहाणही गेली.

लिफ्ट दिली आहे दारूला पैसे पण दे म्हणत ऋषिकेश दोघा अल्पवयीन मुलांना त्रास देणे सुरू केले होते, त्यातच मारहाणही सुरू केल्याने एकाला राग आला आणि त्याने दगडाने तोंड ठेचून त्याला मारले.

ऋषिकेश याच्या तोंडाला मार लागल्याने आणि रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता, त्यावेळी दोघेही अल्पवयीन मुले पळून गेले होते. मानवी कौशल्याच्या आधारे पोलीसांनी या खुनाच्या घटनेची उकल केली आहे.

हे सुद्धा वाचा

पंचवटी परिसरातील हमालवाडी परिसरातील पाटाच्या बाजूलाच ही घटना घडली होती. यामध्ये अल्पवयीन मुलांनी दगडाच्या सहाय्याने तोंड ठेचून आणि तेही अगदी क्षुल्लक कारणावरून खून केल्यानं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने याबाबत सीसीटीव्ही आणि इतर मानवी कौशल्याच्या जोरावर ऋषिकेशच्या खुनाचा उलगडा केला आहे. मात्र यामध्ये अल्पवयीन मुलं थेट गुन्हेगारी करू लागल्याने चिंतेचे कारण निर्माण झाले आहे.

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.