धक्कादायक, नवऱ्यानेच बायकोचा अश्लील व्हिडिओ बनवून मागितले 10 लाख, कारण….

आतापर्यंत आपण महिलेला, मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे पैसे मागितल्याची बरीच प्रकरण ऐकली आहे. यात आरोपी प्रियकर किंवा बाहेरचा असतो. पण आता एका प्रकरणात नवऱ्यानेच स्वत:च्या बायकोचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याकडे 10 लाख रुपये मागितले.

धक्कादायक, नवऱ्यानेच बायकोचा अश्लील व्हिडिओ बनवून मागितले 10 लाख, कारण....
Video
| Updated on: Nov 04, 2025 | 3:23 PM

एका महिलेने आपला पती आणि सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचं म्हणणं आहे की, लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी तिचा छळ सुरु होता. पंचायतीपर्यंत हा विषय गेला होता. तडजोडही झाली. मग, एक दिवस अचानक नवऱ्याने तिला नशेचा पदार्थ प्यायला दिला आणि अश्लील व्हिडिओ बनवला. तेव्हापासून तो पत्नीला ब्लॅकमेल करत होता. व्हिडिओ डिलिट करण्यासाठी 10 लाखाची मागणी केलेली. नवरा-बायकोच्या नात्यावरचा विश्वास उडेल अशी ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये घडली आहे.

विवाहितेचा असाही आरोप आहे की, नवऱ्याचं बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत अफेअर सुरु आहे. त्याला तिच्यासोबत लग्न करायचय. म्हणून तो माझा छळ करतो. गोरखनाथ पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. सोमवारी एक महिला रडत, रडत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने पोलिसांना सांगितलं की, साहेब माझी मदत करा. माझ्या नवऱ्यानेच माझा अश्लील व्हिडिओ बनवलाय. मी त्याला व्हिडिओ डिलिट करायला सांगितला, तर तो माझ्याकडे 10 लाख रुपये मागतोय.

युवतीसोबत त्याचे अनैतिक संबंध

पीडितेने सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच सासरचे माझ्यासोबत नीट वागत नाहीयत. महिलेने सांगितलं की, तिचा पती सीतापुरच्या एका फॅक्टरीत नोकरी करतो. तिथे काम करणाऱ्या युवतीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नवरा मला ब्लॅकमेल करतोय. महिलेच्यानुसार तिने विरोध केल्यानंतर नवऱ्याने तिला त्रास देण्याचा प्लान बनवला. एकदिवस नशेचा पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केलं. सर्व मर्यादा ओलांडत तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.

10 लाख रुपयांची मागणी

नवऱ्यानेच बायकोला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने सांगितलं की, व्हिडिओ डिलिट करण्याच्या नावाखाली तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करतोय. रक्कम न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करुन कुटुंबाला बदनाम करण्याची धमकी देतोय.

महिलेने अजून काय सांगितलं?

लग्न झाल्यापासून नवरा आणि सासरकडचे हुंड्यासाठी आपला छळ करतायत असं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. अनेकदा मारहाण करुन घराबाहेर काढलय. पंचायतीने 2016 साली तडजोड घडवून आणलेली. पण अलीकडच्या वर्षात पुन्हा अत्याचार वाढलाय. पीडितेच्या तक्रारीवरुन सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतलाय.