प्रियकराची हौस भागवण्यासाठी अल्पवयीन मुलीची चोरी, नातेवाईकांच्याच घरातील दागिन्यांवर डल्ला

प्रियकराची हौस भागवण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने (Minor girl theft jewellery) नातेवाईकांच्याच घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली.

प्रियकराची हौस भागवण्यासाठी अल्पवयीन मुलीची चोरी, नातेवाईकांच्याच घरातील दागिन्यांवर डल्ला
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 3:25 PM

नाशिक : प्रियकराची हौस भागवण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने (Minor girl theft jewellery) नातेवाईकांच्याच घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नातेवाईकांच्या घरी आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी प्रेयसीने घरातील दागिन्यांवर डल्ला मारला (Minor girl theft jewellery).

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी प्रेमी युगुलास अटक केली. दरम्यान, प्रियकराची हौस भागवण्यासाठी करण्यात आलेल्या या चोरीच्या घटनेची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

जानकी नागपाल या महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार केली होती. जानकी या नाशिकच्या पाटीदार भवन या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी त्यांनी नातेवाईकांनीदेखील आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात जानकी नागपाल यांची 16 वर्षीय नणंद आपल्या आजीसह सहभागी झाली.

वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर जानकी यांची नणंद आणि आजी रात्रभर मुक्कामी थांबले. यावेळी मध्यरात्री सर्व झोपले असताना नणंदने म्हणजेच अल्पवयीन प्रेयसीने लाखो रुपयांचे दागिणे आणि 26 हजार रुपयांची रोख रकमेची चोरी केली. तिने घरी जाताना आपल्या प्रियकाच्या ताब्यात दागिणे आणि पैसे दिले.

काही तासांनी नागपाल कुटुंबाला आपल्या घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरीचा छडा लावत प्रियकर आणि प्रेयेसीला बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : लोकनेते पुन्हा एकत्र, विलासरावांच्या बाजूला गोपीनाथरावांचं स्मारक!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.