अल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, नराधमाला अटक

या नराधमाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • मोतीलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव
  • Published On - 12:16 PM, 28 Oct 2020
अल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, नराधमाला अटक

चाळीसगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या (Minor Rape Case) नराधमाच्या चाळीसगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या नराधमाने एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे (Minor Rape Case).

या नराधमाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

चाळीसगावातील शिवशक्ती नगर येथील 14 वर्षीय मुलीला अज्ञात ठिकाणी नेऊन आरोपी शंकर रवींद्र चौधरीने ( वय 23) तिच्याशी नैसर्गिक कृत्य केलं. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना मुलीने आपल्या बहिणीला सांगितली. त्यानंतर बहिणीने थेट पीडित मुलीला घेऊन चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 376 आणि बालकांच्या लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय साठे करत आहेत.

Minor Rape Case

संबंधित बातम्या :

विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा