शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, मोटरसायकल 200 फुट दरीत कोसळली

भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट निघालेल्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला. मोटर सायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळली

शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, मोटरसायकल 200 फुट दरीत कोसळली
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 12:48 PM

पुणे – भोर (bhor) येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या (raigad) दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फुट दरीत कोसळली. ही घटना सकाळी साडेतीनच्या सुमारा घडली असून वरंध (warandh) घाटात अपघात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. अपघातामध्ये तीघेजण एकाच मोटारसायकलवर (bike) होते. गाडीवर संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे. तिघांनाही महाडच्या ग्रामीण रूगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत.

ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू 

शिवजयंती संपुर्ण महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते, तसेच प्रत्येक भागात वेगवेगळ्या पध्दतीने जयंती साजरी होताना आत्तापर्यंत आपण अनेकदा पाहिलं देखील आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या जयंतीचा उत्सव यंदा जोरात होणार असं वाटतंय. कारण मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा अधिक उत्साहाने शिवजयंती साजरी करीत आहेत. भोर इथून तीन तरूण एकाच मोटारसायकलवरून निघाले होते. त्यावेळी घाटाचा अंदाज न आल्याने तिघेही दरीत कोसळले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी त्यांना जवळच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात केले. एकाला किरकोळ लागले असल्याने प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे, दोघेजण तिथल्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी मोटारसायकल चालवत असताना नव्या ठिकाणी काळजी घ्या.

महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेली माहिती

भोर येथुन रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट निघालेल्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्या जवळ अपघात झाला. मोटर सायकल सुमारे 200 फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन तरुण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सुर्यवंशी 20 सर्व राहणार भोंगवली तालुका भोर अशी जखमींची नाव आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन एकाला प्रथोमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले असल्याचे तिथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.

कोविडमध्ये दुनिया त्रासात असताना भारतात वाढली श्रीमंतांची संख्या, वाचा सर्वेक्षणाच्या या खास गोष्टी! 

शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना, कोणकोणत्या वस्तूंचे होणार वाटप, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.