मुंबईः दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आज मुंबईतील एका हॉटेलात सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन डेलकर यांच्या मृतदेहाजवळ एक नोट सापडली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण लिहिलेलं असल्याची चर्चा आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय. (MP Mohan Delkar Suicide Mystery Grows; What In a Suicide Note?)
मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे सध्याचे खासदार आहेत. गेली सात टर्म ते सतत निवडून येत आहेत. त्यांचं मुंबईत अधूनमधून येणं-जाणं असायचं. काल संध्याकाळी ते मुंबईत आले होते. हॉटेल सी ग्रीनमध्ये ते उतरले होते. ते गाडी घेऊन आले होते. त्यांच्या सोबत त्यांचा ड्रायव्हरही होता. आज दुपारी मोहन यांच्या रूमचा दरवाजा उघडला जात नव्हता. याबाबत त्याच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तो उघडला गेला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. यावेळी मोहन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. यात त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण चौधरी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगवेगळ्या यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिकचे अधिकारीही आले होते. सध्या डोलकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम सुरू आहे. डोलकर यांच्या मृत्यूबाबत कळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.
सध्या खासदार असलेल्या मोहन डेलकर यांनी आत्महत्या का केली, याबाबत मुंबई पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस आता तपास करत आहेत. मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक खुलासे केल्याची चर्चा आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण ही त्यांनी त्यात नमूद केलंय. त्याच दिशेने आता मुंबई पोलीस तपास करीत आहेत.
58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डोलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकिटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.
संबंधित बातम्या :
तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधलेल्या माजी नगरसेवकाची आत्महत्या, नवी मुंबईत खळबळ
MP Mohan Delkar Suicide Mystery Grows; What In a Suicide Note?