Malad Suicide : मालाडमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट

रविवारी ही युवती युवकाला भेटायला आली होती. युवती आल्यानंतर दोघांनीही रुमचा दरवाजा लावून घेतला. मात्र बराच कालावधी उलटून गेला तरी दरवाजा उघडला नाही. तसेच रुममध्ये काही हालचालीही ऐकू येत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

Malad Suicide : मालाडमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट
अंबरनाथमध्ये महिलेवर सहकाऱ्याकडून लैंगिक अत्याचार
Image Credit source: tv9 marathi
गोविंद ठाकूर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 06, 2022 | 1:45 AM

मुंबई : अज्ञात कारणावरुन एका प्रेमी युगुला (Couple)ने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना रविवारी दुपारी मालाडमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती मालाड पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलीस (Malad Police) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे या जोडप्याने आत्महत्या का केली ? आणि त्यांची नावे अद्याप कळू शकली नाहीत. मालाड पोलीस आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता घटना उघड

मालाड वर्लम चर्च परिसरातील झोपडपट्टीत मयत युवक भाड्याच्या खोलीत राहत होता. युवक गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी ही युवती युवकाला भेटायला आली होती. युवती आल्यानंतर दोघांनीही रुमचा दरवाजा लावून घेतला. मात्र बराच कालावधी उलटून गेला तरी दरवाजा उघडला नाही. तसेच रुममध्ये काही हालचालीही ऐकू येत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ मालाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हे जोडपे कुठले आहे ? त्यांची नावे काय आहेत ? त्यांनी आत्महत्या का केली ? याबाबत मालाड पोलीस तपास करीत आहेत. (Couple commits suicide in Malad for unknown reasons)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें