संतापजनक! शाळेत लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराकडून तीन विद्यार्थिनींचा विनयभंग, नामांकित शाळेतील प्रकार

शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संतापजनक! शाळेत लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराकडून तीन विद्यार्थिनींचा विनयभंग, नामांकित शाळेतील प्रकार
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 6:29 PM

महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण शाळेतच विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचं पुन्हा-पुन्हा समोर येत आहे. बदलापुरात याआधीच भयानक घटना घडली आहे. त्या घटनेतील आरोपीवर गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आला होता. बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. पण अशा घटनांनंतरही तशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या आरोपींना रोखण्यात यश येताना दिसत नाही. काही नराधम आजही अशाप्रकारचं विकृत कृत्य करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भांडुपमध्ये एका नामांकीत शाळेत अवघ्या पाचवी इयत्तेतील विद्यार्थिंनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोपाल गौडा (वय २७) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टचे मेंटेनन्सचे काम करत होता. त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान तिथे पाचवी इयत्तेच्या मुली योगा क्लासेससाठी आल्या होत्या. त्यावेळी गोपाल याने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला. तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

शाळेच्या प्रशासने आरोपीला केलं पोलिसांच्या स्वाधीन

आरोपी गोपालच्या वर्तनाने तिघी मुली घाबरल्या. त्या तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या. या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गवडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोपाल याला 2 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.