मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक, 23.5 लाख लुटणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

पोलिसांनी देवकरचं अकाऊण्ट सीलकरुन गुगलने जमा केलेल्या 23 लाख 50 हजार रुपयांपैकी वीस लाख रुपयांची रक्कम जप्त केली (YouTuber Bank Account Hacked )

मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक, 23.5 लाख लुटणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या
Online-Frauds
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:58 AM

मुंबई : मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक करुन आपल्या खात्यात 23.5 लाख रुपये वळवणाऱ्या बदमाशाला सायबर सेल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मेकॅनिकल इंजिनिअरच्या अकाऊण्टमधून वीस लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Mumbai YouTuber Ashish Bhatia Bank Account Hacked by Mechanical Engineer Online Fraud Cyber Crime)

उत्तर प्रादेशिक विभाग सायबर सेलने ललित रघुनाथ देवकर (Lalit Devkar) नावाच्या मेकॅनिकल इंजिनिअर अटक केली आहे. सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरला वसावे यांनी ही कारवाई केली. मुंबईतील गोरेगाव भागातील दिंडोशी परिसरात राहणारे आशिष भाटिया (Ashish Bhatia) यांनी तक्रार दिली होती.

भाटियांची 20-25 लाखांची कमाई

भाटिया हे वेब सीरीजसह अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन यूट्यूबवर अपलोड करतात. व्हिडीओ सब्सक्रिप्शनच्या आधारे त्यांना गुगलकडून दरमगा जवळपास 20 से 25 लाख रुपयांची रक्कम येते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते.

एप्रिल महिन्यात पैसे न आल्याने शंका

एप्रिल महिन्यात फिर्यादी आशिष भाटिया यांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे भाटिया चक्रावून गेले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांचं बँक अकाऊण्ट हॅक झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

वीस लाख जप्त

आशिष भाटिया यांनी तातडीने सायबर सेलकडे धाव घेतली. ज्या अकाऊण्टमध्ये गूगलने पैसे जमा केले होते, ते ललित रघुनाथ देवकर याच्या नावावर असल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलं. पोलिसांनी देवकरचं अकाऊण्ट सीलकरुन गुगलने जमा केलेल्या 23 लाख 50 हजार रुपयांपैकी वीस लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तूर्तास आरोपीला 11 मेपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या 

केजरीवालांच्या कन्येची 34 हजारांना फसवणूक, तिघांना अटक, मास्टरमाईंड परागंदा

एकावर दोन थाळी फ्री मिळवण्याच्या नादात गंडा, पुण्यातील खवय्याची 31 हजारांना फसवणूक

(Mumbai YouTuber Ashish Bhatia Bank Account Hacked by Mechanical Engineer Online Fraud Cyber Crime)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.