अहमदनगरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून

चार वर्षीय मुलीच्या कानातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या‌त मुलगी जखमी झालीय.

  • मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी
  • Published On - 21:14 PM, 19 Jan 2021
अहमदनगरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून

अहमदनगर (शिर्डी) : गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अहमनगरमध्येही दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात ही घटना घडली असून, या घटनेनं आजूबाजूचा परिसर हादरून गेलाय. दागिने लुटण्याच्या उद्देशाने दुपारच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून, सावित्रीबाई शेळके या 80 वर्षीय वृद्धेचा खून करण्यात आलाय. तसेच चार वर्षीय मुलीच्या कानातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या‌त मुलगी जखमी झालीय. (Murder Of a Woman All Day In An Attempted Robbery In Ahmednagar)

चोरीच्या उद्देशाने गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिलीय. आरोपींच्या‌ शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

मोबाईल देत नसल्याच्या रागात मुलाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगण चोपायच्या चोपणी डोक्यात वार केल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील काम सुटल्याने आरोपी मुलगा भावेश हा आपल्या वडिलांसोबत राहत होता. वडील भागुराम माझा मोबाईल देत नाहीत, या एका क्षुल्लक कारणामुळे त्यांच्या वाद व्हायचे. काल रात्री 8 च्या सुमारास भावेश आणि वडिलांचा वाद झाला. त्यावेळी भावेशला राग अनावर झाला. त्याने दारूच्या नशेत जन्मदात्या बापाला अंगण चोपण्यासाठी वापरात येणाऱ्या चोपणीने वार केले. यात भागूराम यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने हा प्रकार कोणालाही समजला नाही.

गोंदियात तलवारीने वार करीत एकाची हत्या; चार आरोपींना अटक

गोंदिया शहरात तलवारीने वार करीत एकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडालीय. शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सहयोग रुग्णालयाच्या परिसरात 14 जानेवारीच्या रात्री 11 वाजताच्यादरम्यान ही घटना घडलीय. काही अज्ञात आरोपींनी रुग्णालयात आलेल्या 34 वर्षीय रविप्रसाद बंबारे या तरुणावर रुग्णालयाच्या प्रांगणात तलवारीने वार करीत त्यांची निर्घृण हत्या केली आणि पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय.

संबंधित बातम्या

गोंदियात तलवारीने वार करीत एकाची हत्या; चार आरोपींना अटक

Murder Of a Woman All Day In An Attempted Robbery In Ahmednagar