मुलाच्या हव्यासापोटी सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून, निर्दयी मातेला बेड्या

दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाल्याने सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (child murder by mother)

  • नविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 19:56 PM, 30 Nov 2020
मुलाच्या हव्यासापोटी सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून, निर्दयी मातेला बेड्या

पुणे : दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाल्याने सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदेत्या आईनेच या चिमुरडीला संपवल्याचे सांगितले जात आहे. बारामती तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला. (murder of own child by mother in Baramati)

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या दिपाली झगडे बाळंतपणासाठी आपल्या माहेरी माळेगाव येथे आल्या होत्या. यावेळी घरातील पाळण्यात झोपेत असलेली सव्वा महिन्यांची चिमुकली 25 नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली. ही माहिती चिमुकलीच्या आईनेच तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांकडून गायब झालेल्या मुलीचा शोध घेणे सुरु झाले. यावेळी शोधाशोध सुरू असताना घराजवळच असलेल्या एका पाण्याच्या टाकीत या चिमुकलीचा मृतदेह आढळला.

ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीचे कुटुंबीय तसेच चिमुकलीची आई या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी चिमुकलीच्या आईची चौकशी करताना पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून जन्मदेत्या आईनेच केल्याचे समोर आलं आहे.

दरम्यान, दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाल्यानं दिपाली झगडे यांनी आपल्या मुलीला संपवल्याचे सांगितले जात आहे. झगडे यांनी पाण्याच्या टाकीत बुडवून चिमुकलीचा खून केल्याचा सांगितले जात आहे. या प्रकरणी संशयित दिपाली झगडे या मातेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या मातेची कसून चौकशी करत आहेत.

अमरावतीत दीड महिन्याच्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

दरम्यान, हृदय पिळवटून टाकणारी अशीच आणखी एक घटना अमरावतीत घडली आहे. न्यू प्रभात कॉलनी येथे अपहरण केलेल्या बाळाचा मृतदेह ( child found dead) घरातल्याच विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत अवस्थेत आढळलेले बाळ फक्त दीड महिन्यांचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (one and half month child found dead in well in Amravati)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (29 नोव्हेंबर) मृत बाळाच्या घरातील काही सदस्य लग्न समारंभात गेले होते. ही संधी साधत अज्ञातांनी बाळाचे अपहरण केले. बाळ गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी बाळाचा शोध घेतला. मात्र, ते न सापडल्याने कुटुंबाने शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी बाळाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी (30 नोव्हेंबर) घरातीलच विहिरीत बाळाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ ऊडाली.

संबंधित बातम्या :

मुंबईत पुन्हा 50 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त, कुर्ला परिसरातून महिलेला अटक

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

(murder of own child by mother in Baramati)