परभणीत शिवसेना नगरसेवक अमर रोडेंची हत्या

परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संबंधित नगरसेवकाचे नाव अमरदीप रोडे असे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची मध्यरात्री कुऱ्हाडी तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून हत्या […]

परभणीत शिवसेना नगरसेवक अमर रोडेंची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संबंधित नगरसेवकाचे नाव अमरदीप रोडे असे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची मध्यरात्री कुऱ्हाडी तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही निर्घृण हत्या बघून परभणी जिल्हा हादरून गेला आहे. परभणीत शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून अमरदीप रोडे यांच्याकडे बघितले जात होते, परंतु त्यांची हत्या ही राजकीय पार्श्वभूमीवर झाली की गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हे मात्र अद्याप कळलेले नाही.  अमरदीप रोडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही हत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर झालेली आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो.

पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असून रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येनंतर या हत्येत सहभागी असणारे २ आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही किरकोळ कारणातून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या हत्येमागे राजकीय कारण आहे की अन्य काही हे मात्र तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये माजी नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यातच आज परभणीतही झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या हत्येने बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या घटनांमुळे लोकसभा निवडणुकीत मराठवाडा रक्तरंजित निवडणुकीकडे वळतो की काय अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न निर्माण होत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.