पालघर: तलासरीतील जंगलात झालेल्या नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या जळीतकांडात धक्कादायक खुलासे समोर आलेत. मृत्यूपूर्वी सुरजकुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद ही खोटी असून, त्यांनी घेतलेले कर्ज आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासूनही लपवल्याची माहिती मिळाली. कर्जाची परतफेड करावयास लागू नये म्हणून सुरज कुमार दुबे यांनी हा बनाव केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झालीय. पोलीस पुढील तपास अजून करीत आहेत. (Murder Or Suicide Of Navy Officer Suraj Kumar Dubey ?; The Mystery Grew)
नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांचं खंडणीसाठी अपहरण झालं नसून त्यांनी स्वतः हा बनाव केला असल्याचं प्राथमिक तपासात उघड झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. पालघर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा खुलासा करण्यासाठी शिंदे यांनी इतकी घाई का केली, असा सवाल ही उपस्थित झाला आहे.
नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून, या गुंतवणुकीत त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. तसंच सुरजकुमार यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्ज ही घेतलं होतं. सुरजकुमार दुबेचा अपहरणानंतर चेन्नई आणि तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुबे मुक्तविहार करत असल्याचं समोर आलं होतं.
तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपावरून त्यांनी तीनशे रुपयांचं डिझेल बाटलीतून खरेदी केल्याचं उघड झालंय, असे शिंदे यांनी सांगितलं. सुरजकुमार दुबे यांचे चेन्नई ते पालघर प्रवास कसा झाला ही बाब अजून गुलदस्त्यात आहे. या तपासासाठी जिल्ह्यातील तब्बल शंभर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दहा टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.
संबंधित बातम्या
ना साधू सुरक्षित, ना जवान; पालघरमधील जवानाला जिवंत जाळल्यावरून भाजपचा हल्लाबोल
Murder Or Suicide Of Navy Officer Suraj Kumar Dubey ?; The Mystery Grew