न्यूड फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, तरुणासह दोघी जणींना अटक

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले

न्यूड फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, तरुणासह दोघी जणींना अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 9:57 AM

बुलडाणा : 15 वर्षीय मुलीचे न्यूड फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमकीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी नराधम आणि त्याला मदत करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले. ते फोटो व्हायरल करुन तुझ्या आई – बाबांना दाखवेन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

एवढंच नव्हे तर त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी नराधम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली.

पीडितेची घरी तक्रार

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील असलेला आरोपी 30 वर्षीय भूषण गजानन बोरसे या नराधमाच्या धमक्यांना बळी पडून वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या अब्रूचे लचके तोडण्याचे कृत्य या नराधमाने केले. वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने सर्व हकीकत आपल्या घरी सांगितली.

पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम 376(2) (N), 354 आ (i), 506, 34 आयपीसी सहकलम 4 बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंदवला.

कोल्हापुरात पोलिसाकडून बलात्कार

दुसरीकडे, कोल्हापुरात एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. येथे नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसाकडूनच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडली आहे.

राजेंद्र गणपती पाटील असं अत्याचार करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. राजेंद्र पाटील हा पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा आहे. संबंधित पोलीस हा मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

Video: चोरट्याला धडा शिकवण्यासाठी तो धावला पण त्रिपाठीनं डाव साधला, वसईतल्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, पीडिता गरोदर, कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.