Nanded Accident : भरधाव कारची स्कूटीला धडक! कामावर जाणाऱ्या कामगारावर काळाचा घाला, जागीच ठार

आठ दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय.

Nanded Accident : भरधाव कारची स्कूटीला धडक! कामावर जाणाऱ्या कामगारावर काळाचा घाला, जागीच ठार
नांदेडमध्ये अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:12 AM

नांदेड : नांदेडमध्ये दुचाकीच्या अपघातांचं (Nanded Accident) प्रमाण लक्षणीय आहे. आता आणखी एक अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. एका कार आणि दुचाकीमध्ये हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर बिजूर (Shankar Nagar Bijur) रस्त्यावर कार आणि स्कूटी यांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला. यामध्ये 40 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारचं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला, असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे. अपघातामध्ये ठार झालेल्या मृत कामगाराचं नाव मरीबा टोपे असं आहे. मरीबा टोपे हे कामावर जाण्यासाठी निघाले होते. स्कूटीवर कामाला जात असता झालेल्या या अपघातात मरीबा जागीच ठार झाले. राज्यात रस्ते अपघातांची चिंता (Nanded Road Accident) वाढली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात झालेला हा आणखी एक अपघात आहे. सांगलीतील अपघाताची घटना ताजी असतानाचा आता नांदेडमधूनही अपघाताचं वृत्त समोर आलं आहे.

अपघातांची वाढती चिंता

सांगलीत भजनासाठी जाणाऱ्या एका भजनी मंडळाच्या टेम्पोची आणि वॅगनार कारची धडक झाली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच ते सात जण जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या रस्ते अपघातांनी चिंता वाढवली आहे. रस्ते अपघातातील बळींचा वाढता आकडाही काळजी वाढवणारा आहे.

बसने दुचाकीला चिरडलं

दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला होता. नांदेडहून त्रिकुटकडे जाणाऱ्या दुचाकीला खाजगी बसने धडक दिली. यात एक 22 वर्षीय गरोदर महिला ठार झाली तर अन्य दोनजण जखमी झाले. मंगळवारी दुपारी शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. शिवाजी डांगे हे पत्नीसह आणि चंद्रकांत मोरे हे तिघे एका दुचाकीवरून जात होते. पेट्रोल पंपाजवळ दुचाकी रस्ता ओलांडताना भरधाव आलेल्या खाजगी बसने त्यांना चिरडले. दुचाकीला बसने चिरडलेला क्षण सीसीटीव्हीत कैद झालाय.

पाहा व्हिडीओ : पाम बीच रोडवर अपघात

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....