विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्या, आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

बुधावरी जेवणामध्ये सोयाबीनची भाजी आणि रोटी बनविण्यात आली होती. या भाजीत विद्यार्थ्यांना अळ्या आढळल्या. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्या, आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार
विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 5:02 PM

नाशिक : नाशिकच्या चांदवड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या (Larvae) आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात (Hostel) राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण (Meal)ही व्यवस्थित मिळत नाही. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या भाजीत चक्क अळ्या आढळल्याची खळबळ घटना घडली आहे. वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

बुधावरी जेवणामध्ये सोयाबीनची भाजी आणि रोटी बनविण्यात आली होती. या भाजीत विद्यार्थ्यांना अळ्या आढळल्या. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधीक्षकांना पत्र लिहून सर्व माहिती दिली.

सध्या वसतिगृहात 40 विद्यार्थी राहतात

सद्यस्थितीत 40 विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. त्यांच्या भागात सोयी सुविधा नसल्याने चांदवडमध्ये राहून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. अळ्यांबाबत विद्यार्थ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना जाब विचारला. मात्र ठेकेदाराकडून याउलट विद्यार्थ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

वसतिगृहात सुविधांची वाणवा

या वसतिगृहात सोयी-सुविधांचीही मोठी वानवा आहे. वसतिगृहातील खिडक्या, दरवाजे, गाद्या, चादरी अतिशय खराब आहेत. बाथरुममध्ये पाणी नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवणही नित्कृष्ट दर्जाचे असते. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येतेय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.