नाशकात इन्स्टावरील मैत्री महागात, प्रेमाच्या बहाण्याने अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर

एका तरुणाने प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याने तिच्यासोबत घट्ट मैत्री असल्याचा भास करत, तिची वारंवार भेट घेत शारीरिक अत्याचार केले.

नाशकात इन्स्टावरील मैत्री महागात, प्रेमाच्या बहाण्याने अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर
Instagram

नाशिक : इन्स्टाग्रामवरील मैत्री अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. नाशिकमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. इन्स्टावरील मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग त्याचं रुपांतर शारीरिक संबंधात झालं. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर (minor girl pregnant) राहिल्याचं उघड झालं आहे. नाशिकमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. (Minor girl pregnant after Instagram friend forced in Nashik Maharashtra crime)

एका तरुणाने प्रेमाचा बनाव करत अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याने तिच्यासोबत घट्ट मैत्री असल्याचा भास करत, तिची वारंवार भेट घेत शारीरिक अत्याचार केले. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने तणावात येत सर्व प्रकाराची वाच्यता केली.

सध्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरू आहेत. मात्र अशा सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे कसं महागात पडू शकतं हे यावरुन दिसून येत आहे.  दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. सातपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं? 

नाशिकमधील तक्रारदार तरुणीला संशयित आरोपीने इन्स्टावर फॉलो केलं होतं. पुढे या दोघांची इन्स्टावरील चॅटिंग वाढत गेलं. पुढे या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले. त्यांची जवळीक वाढली. यानंतर दोघांचेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दोघेही एकमेकांना अनेकवेळा भेटले. त्यावेळी तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामुळे संबंधित मुलगी गरोदर राहिली.

मुलीला त्रास सुरु होऊ लागल्याने ती घाबरुन गेली. या सर्व प्रकाराने भेदरुन गेलेल्या मुलीने पुढे हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरुन झालेली मैत्री पुढे जाऊन असं रुप घेईल, हे कदाचित दोघांनाही वाटलं नसेल. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावरुन मैत्री करण्यापूर्वी सावध राहा.

संबंधित बातम्या 

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा   

19 व्या वर्षी लपून नागपुरात, तालिबानी समर्थक अफगाणी तरुणाला 11 वर्षांनी अटक 

(Minor girl pregnant after Instagram friend forced in Nashik Maharashtra crime)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI