शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात! दिंडोरी पोलिसांची कारवाई

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात! दिंडोरी पोलिसांची कारवाई
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी कारवाई
Image Credit source: TV9 Marathi

शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत ट्वीट करणाऱ्या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 11:10 AM

नाशिक : वादग्रस्त ट्वीट (Controversial Tweet on Sharad Pawar) केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक ट्वीट या तरुणानं केलं होतं. दोन दिवसांपूर्वी केलेल्या या ट्वीटवर मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. शरद पवार यांच्याबाबत चुकीच्या भाषेत ट्वीट केल्याप्रकरणी संतापही व्यक्त करण्यात आला होता. अखेर या तरुणाला नाशिक पोलिसांनी (Nashik Crime News) ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जाते आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मुंबई पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुंबई ठाणे आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टॅग केलंल. दरम्यान, आता नाशिक पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बागलाणकर नावाच्या एका ट्वीटर युजरनं हे ट्वीट केलं होतं. नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.

तरुणानं केलेलं ट्वीट नेमकं काय होतं? वाचा

वेळ आली आहे बारामचीच्या गांधी साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… #बाराचा_काका_माफी_माग‘ असं ट्वीट 11 मे रोजी या तरुणानं केलं होतं. या तरुणानं नाव निखिल भामरे असल्याचं त्याच्या ट्विटर आयडी युजरवरुन लक्षात येतंय. दरम्यान या तरुणाच्या ट्वीटवरुन जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत या तरुणावर कारवाईची मागणी केलेली.

शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत ट्वीट करणाऱ्या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर लगेचच नाशिकच्या दिंडोपी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय.

केतकीचीही वादग्रस्त पोस्ट..

दरम्यान, आक्षेपार्ह ट्वीटचे वृत्त ताजं असतानाच अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनंही वादात भर टाकली आहे. केतकी चितळेनं शरद पवारांबाबत एक एक कविता फेसबुकवरुन शेअर केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. केतकी चितळेनं केलेल्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कळव्यामध्ये केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एकीकडे कळव्यामध्ये केतकी चितळेविरोधात पवारांबाबत अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तर दुसरीकडे शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याबाबत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें