लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु

शहरातील लिकर किंग म्हणून ओळख असलेल्या अतुल मदनला पोलिसांनी फरार घोषित केले आहे

  • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 14:21 PM, 25 Nov 2020
लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु

नाशिक : शहरातील लिकर किंग म्हणून ओळख असलेल्या अतुल मदनला पोलिसांनी फरार घोषित केले आहे (Liquor King Atul Madan). मदनच्या शोधार्थ नाशिक पोलिसांच्या 2 टीम रवाना झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा मद्यसाठा लिकर किंग अतुल मदनच्या वाईनशॉपमध्ये जात असल्याचं समोर आल्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अतुल मदन याचे नाशिक मधील 14 वाइनशॉप सील करण्यात आले होते (Liquor King Atul Madan).

दरम्यान, या कारवाईनंतर अतुल मदन फरार झाला असून नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने मदन याला तात्काळ अटक न करता एकप्रकारे संधी दिल्याची चर्चा सध्या शहरात आहे. अतुल मदनवर झालेल्या कारवाईने शहरातील वाईनशॉप चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नेमकं प्रकरणं काय?

सर्वसामान्यांना किरकोळ गुन्ह्यांसाठी खाक्या दाखवणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने, लिकर किंग अतुल मदनचे शहरातील तब्बल 14 दारु दुकानं सील केल्यानंतर देखील त्याला अटक न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. तीन दिवसांपूर्वीच ग्रामीण पोलिसांनी अवैध मद्यसाठा करणारा ट्रक पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गेल्या आठवड्यात नाशिक हद्दीत पशू खाद्याच्या ट्रकमधून जाणारा अवैध मद्यसाठा पकडला होता. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा हा मद्यसाठा शहरातील एकाच दारु दुकान मालकाच्या दुकानांमध्ये जात होता. नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईने अवैध मद्यविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत (Liquor King Atul Madan).

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करुन लिकर किंग अतुल मदनच्या मालकीच्या 14 दारु दुकानांना सील करत धडक कारवाई केली होती. दरम्यान, एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केलेली असताना, उत्पादन शुल्क विभाग मात्र, अतुल मदन यांच्याकडून खुलासा आल्यानंतर अटक करु, अशा डिफेनसिव्ह मोडमध्ये का आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Liquor King Atul Madan

संबंधित बातम्या :

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली