महाविद्यालयीन तरुणी पुन्हा भिडल्या, झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी…व्हिडिओ व्हायरल

नाशिकमधील तरुणी आपापसात भिडण्यामागील कारण अद्याप समोर आले नसले तरी उपहार गृहात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला होता.

महाविद्यालयीन तरुणी पुन्हा भिडल्या, झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी...व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 3:02 PM

नाशिक : नाशिक शहरातील काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयातीन तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आत्ताही पुन्हा एकदा सोशल मीडियावर तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या महाविद्यालयातील हा व्हिडिओ असून हाणामारीची जोरदार चर्चा होत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकांच्या केस ओढतांना दिसून येत आहे. हीच फ्री स्टाईल हाणामारी महाविद्यालयातील तरूणांणी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करत व्हायरल केली आहे. मुलींसह त्यांच्या पालकांना नाशिकच्या सरकारवाडा पोलीसांनी समज देण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रशासनाने याबाबत मुलींसह त्यांच्या पालकांकडून लेखी माफी लिहून घेतली जाणार आहे. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाही.

नाशिकमधील तरुणी आपापसात भिडण्यामागील कारण अद्याप समोर आले नसले तरी उपहार गृहात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला होता.

बाहेर गेल्यावर भेटू म्हणत तरुणी उपहार गृहतून बाहेर आल्या होत्या, त्यांनंतर शाब्दिक वाद सुरू झाला, वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी याच महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर के व्ही एन नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये असाच वाद झाला होता, त्यामध्ये तरुणींनी एकमेकांच्या झिंज्या उपटल्या होत्या.

नाशिकमधील तरुणींचे कारण हे मुलांवरून असल्याची चर्चा झाली होती, मात्र तेव्हाही पोलीसांनी समज देत हाणामाऱ्या करू नका असं आवाहन केलं होतं.

महाविद्यालयात तरुणांचा वाद झाल्यावर हाणामारीच्या घटना समोर येत असायच्या मात्र, नाशिकमध्ये तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने तरुणाईमध्ये तरुणींच्या हाणामारीची चर्चा होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.