सव्वा महिन्याच्या निष्पाप चिमुरडीचा खून, माळेगावमधील घटनेनं बारामती हादरली

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज (25 नोव्हेंबर) समोर आली आहे new born girl child killed in baramati).

  • नाविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 21:55 PM, 25 Nov 2020
सव्वा महिन्याच्या निष्पाप चिमुरडीचा खून, माळेगावमधील घटनेनं बारामती हादरली

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज (25 नोव्हेंबर) समोर आली आहे. पाळण्यात झोपवलेल्या चिमुरडीचा मृतदेह आज दुपारी पाण्याच्या टाकीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (new born girl child killed in baramati).

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील दिपाली संदिप झगडे ही विवाहिता बाळंतपणासाठी माळेगाव येथे गेली होती. दिपाली या आज दुपारी आपल्या सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाळण्यात झोपवून स्वत:ही झोपी गेल्या. त्यांना तीन वाजेच्या सुमारास जाग आली. जाग आल्यानंतर त्या आपल्या मुलीला बघण्यासाठी गेल्या. मात्र, त्यावेळी मुलगी पाळण्यात नव्हती. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केला.

या दरम्यान, दिपाली यांचे वडील संदिप जाधव यांनी बारामती तालुका ठाण्यात धाव घेतली. तोपर्यंत शेजारील टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. याबाबत बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

(new born girl child killed in baramati)

हेही वाचा : 

आतातरी सावध व्हा! राज्यात कोरोनाची पुन्हा उसळी; नव्या रुग्णसंख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला