पश्चिम बंगालमधल्या 11 संशयित दहशतवाद्यांविरोधात NIAचे आरोपपत्र

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:35 PM, 26 Feb 2021
पश्चिम बंगालमधल्या 11 संशयित दहशतवाद्यांविरोधात NIAचे आरोपपत्र
दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पश्चिम बंगाल आणि केरळमधील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मुर्शिद हसन याच्या नेतृत्वात पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यात अल कायदा तरुणांना प्रोत्साहित करून आपल्या जाळ्यात ओढत होती, त्याच माहितीच्या आधारे एनआयएने हा गुन्हा दाखल केला होता. अल कायदाशी संबंधित दहशतवादी देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कट आखत होते. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. (NIA charges 9 Al-Qaeda operatives from Bengal, Kerala who were planning attacks on ‘kafirs’)

मुर्शिद हसनकडून अल कायदामध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा वापर

मुर्शिद हसन हा पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल कायदाच्या हँडलरच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस झालेय. त्याच्याकडून अल कायदामध्ये भरती होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रचार केला जात होता. मुर्शिद हसन आणि त्याच्या इतर साथीदारांकडून तरुणांचं कट्टरपंथीकरण करून अल कायदामध्ये अधिकाधिक तरुणांची भरती करत होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथी गोष्टींचा प्रसार सुरू केला होता आणि भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी अल कायदा ही संघटना अनेकांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती.

काफीर लोकांवर हल्ला करण्याचीही होती योजना

अल कायद्याच्या गटातील दहशतवाद्यांना काफीर लोकांवर हल्ला करण्याचीही योजना आखली होती. जे लोक त्यांच्याबरोबर नसून विरोधात होते त्यांना काफीर संबोधले जात होते. अशा लोकांवर हल्ल्याची दहशतवादी रणनीती आखल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालंय. शस्त्रे आणि दारूगोळा/स्फोटक वस्तूंच्या खरेदीसाठी निधी गोळा करण्यासाठी, अधिक सदस्य कट्टरपंथी करणे आणि अधिक सदस्य भरती करणे आणि मार्काझ (धार्मिक आणि शस्त्रे प्रदान करण्याचे प्रशिक्षण केंद्र) यासह भविष्यातील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी या गटातील दहशतवाद्यांनी अनेक षड्यंत्रकारी बैठका घेतल्या.

नवी दिल्लीत अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा मिळण्याची योजना

आरोपी व्यक्ती शस्त्रे विक्रेत्याशी परदेशी आधारित हँडलरद्वारे सक्रिय संवाद साधत होते आणि त्यांना नवी दिल्लीत अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा मिळण्याची योजना होती. एनआयएने त्यांना वेळीच अटक केल्याने त्यांच्या योजना धुळीस मिळाली. आरोपी भारतीयांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या विचारांबद्दल बांगलादेशी ब्लॉगरमधल्या इतरांवरही हल्ल्याची योजना आखत होते.

संबंधित बातम्या

दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जम्मू बसस्थानकावरुन 7 किलो स्फोटकं जप्त

NIA charges 9 Al-Qaeda operatives from Bengal, Kerala who were planning attacks on ‘kafirs’