धक्कादायक! साताऱ्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ

माळावर काही नागरिक गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत हा गुन्हा उघडकीस आणला.

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 21:50 PM, 6 Apr 2021
धक्कादायक! साताऱ्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ
Partially Burnt Bodies Satara

सातारा: शहरातील खंडोबाच्या माळावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आज एक मृतदेह आढळल्यानं साताऱ्यात एकच खळबळ उडालीय. माळावर काही नागरिक गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत हा गुन्हा उघडकीस आणला. (Partially Burnt Bodies Were Found In Satara)

जळालेला मृतदेह आकाश राजेंद्र शिवदास (20) वर्षीय तरुणाचा

आकाश राजेंद्र शिवदास (रा. रामनगर) असे मृताचे नाव आहे. याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच साक्षीदार आणि गोपनीय माहितीद्वारे जळालेला मृतदेह हा रामनगर येथील आकाश राजेंद्र शिवदास (20) वर्षीय तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीचे कोणाशी वैर किंवा भांडणतंटे आहेत काय, याची माहिती घेतली.

या प्रकरणात आरोपीसह दोघांची नावे समोर

विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपीसह दोघांची नावे समोर आलीत. त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता मृत आकाश हा विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे याच्या बहिणीला त्रास देत असल्याचं समोर आलं. त्या कारणास्तव चिडून जाऊन विक्रांत याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने 6 मार्च रोजी मध्यरात्री आकाशचा काटा काढला.

आरोपी विक्रांतने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून आकाशचा खून केला

आकाशला जाब विचारत असताना झालेल्या झटापटीत खंडोबाचा माळ येथे आरोपी विक्रांतने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून आकाशचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याची कबुली आरोपीने दिली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून, अवघ्या 5 तासांत या क्लिस्ट गुन्ह्याची उकल झाल्यामुळे सातारा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Deepali Chavan: शिवकुमार आणि रेड्डीवर कारवाई करा, अन्यथा मला फाशी द्या; दीपालीच्या आईचा टाहो

शिकार करताना गोळी सुटून मित्र दगावला, अपराधी भावनेतून तिघांची आत्महत्या

Partially Burnt Bodies Were Found In Satara