पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण

आरोपी शंतनू चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे.

  • रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड
  • Published On - 16:28 PM, 20 Jan 2021
पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. याप्रकरणी अवघ्या सहा तासांच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केलीय. शंतनू चिंचवडे वय असे आरोपी तरुणाचे नाव असून, तरुणी आणि आरोपी शंतनू चिंचवडे यांच्या दोघांमधील प्रेम संबंधातून ही घटना घडलीय. आरोपी शंतनू चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे. (Pimpri-Chinchwad a Young Woman Was Abducted From Her Office At Gunpoint)

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारींचे प्रकरण वाढत चालले आहेत. आता पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचं अपहरण केल्यानं पिंपरी-चिंचवडमध्ये  भीतीचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे आरोपी अपहरण करत असतानाची सर्वच घटना सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाली आहे. आरोपी कशा प्रकारे तरुणीचं अपहरण करत होते, तसेच तरुणीनं कशा प्रकारे आरोपींना प्रतिकार केलाय, हे सर्वच समोर आलंय.

राजस्थानवरून मैत्रिणीकडे आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या पतीकडून अत्याचार

विशेष म्हणजे नागपुरातही अशीच एक घटना समोर आलीय. राजस्थानवरून मैत्रिणीकडे आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या पतीने अत्याचार केल्यानं एकच खळबळ उडालीय. नागपूरच्या गिट्टी खदान हद्दीत ही घटना घडली. तसेच मैत्रिणीने सदर प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर अत्याचार झालेल्या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मैत्रिणीच्या पतीने पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय,16 तारखेला राजस्थानवरून एक तरुणी नागपूरला आपल्या मैत्रिणीकडे आली होती, तिला आपली प्रॉपर्टी विकायची होती, ती रात्री मैत्रिणीच्या घरी थांबली होती.

संबंधित बातम्या

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क मोबाईलची चोरी, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

Pimpri-Chinchwad a Young Woman Was Abducted From Her Office At Gunpoint