VIDEO| धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळून पत्नीच्या पाठोपाठ पतीचीही आत्महत्या; व्हिडीओ व्हायरल

सदर व्हिडीओमध्ये तो आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

  • संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
  • Published On - 22:53 PM, 7 Mar 2021
VIDEO| धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळून पत्नीच्या पाठोपाठ पतीचीही आत्महत्या; व्हिडीओ व्हायरल

उस्मानाबाद : पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यांच्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले असून, सोबत सासरकडील मंडळी देखील माझ्या जिवावर उठली असल्याचा आरोप त्याने व्हिडीओत केलाय. सदर व्हिडीओमध्ये तो आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  (Police Harassment Wife and Husband Commits Suicide In usmanabad)

आत्महत्येपूर्वी नेमकं काय म्हणाले?

आत्महत्या करण्यापूर्वी शेअर केलेला व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, आत्महत्या करण्याचे कारण की हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उद्ध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली. “हरिभाऊ कोळेकर म्हणतो की माझे खूप दूरपर्यंत संबंध आहेत. मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेन,” त्याला फाशी झालीच पाहिजे, असेदेखील त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय.

आत्महत्येचं आणखी एक कारण?

त्यांनी पुढे म्हटले की, माझ्या मृत्यूचे खरे कारण म्हणजे, सासरकडील मंडळीदेखील आहेत. पूर्वी ते मला जावई देवमाणूस आहे म्हणायचे. मात्र, पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी मला अनेकदा शिवीगाळ देखील केली असल्याचे व्हिडीओत सांगितले. दरम्यान त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत औसा तालुक्यातील टाका या गावात आत्महत्या केल्याचे समोर आलेय.

संबंधित बातम्या

बंदुकीच्या धाकाने बलात्कार, विवाहितेची आत्महत्या, दोन सुसाईड नोट्सवरुन पोलिसालाच बेड्या

Police Harassment Wife and Husband Commits Suicide In usmanabad