गोव्यात आलेल्या ब्रिटीश महिलेवर आरंबोल बीचवर बलात्कार, पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक रहिवासी आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसूझा याने 2 जून रोजी ब्रिटिश महिला (British Woman) समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना तिच्यावर बलात्कार केला.

गोव्यात आलेल्या ब्रिटीश महिलेवर आरंबोल बीचवर बलात्कार, पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली
प्रातिनिधिक फोटो
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 07, 2022 | 12:40 PM

उत्तर गोव्यात (Goa) एका 32 वर्षीय व्यक्तीला ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अरंबोल बीचजवळील (Arambol Beach) प्रसिद्ध ‘स्वीट लेक’मध्ये महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याची माहिती गोवा पोलिसांनी सोमवारी दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक रहिवासी आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसूझा याने 2 जून रोजी महिला समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना तिच्यावर बलात्कार केला.

पतीसोबत गोव्यात आलेल्या पीडित महिलेने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्यात परदेशी महिलेवर बलात्काराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 12 मे रोजी भारतात आलेल्या रशियन कुटुंबातील 12 वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.

कुटुंबातील सदस्य बाहेर बाजारात गेले होते

कुटुंबातील सदस्य गोव्यातील अरंबोल येथील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. मुलीला हॉटेलच्या खोलीत सोडून कुटुंबीय बाजारात खरेदीसाठी गेले असता. खोलीत मुलगी एकटी असल्याचे पाहून रूम अटेंडंटने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने आधी तरुणीवर स्विमिंग पूलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर खोलीत नेऊन पुन्हा हा प्रकार घडवून आणला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली होती.

हैदराबादमध्ये देखील बलात्काराच्या दोन नवीन घटना

याचवेळी हैदराबादमध्ये सोमवारी बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या. यातील एक बलात्काराची घटना रामगोपालपेठेतील, तर दुसरी राजेंद्रनगर नगर येथील आहे.दोन्ही घटनांतील आरोपींविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगोपालपेट पोलिस ठाण्याचे निरीक्षक सैदुलू यांनी सांगितले की, त्यांना चाइल्ड वेलफेयर कमिटीकडून या घटनेची तक्रार आली होती. तक्रारीत म्हटलं गेलं होतं की, इंटरमिजिएटच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध POCSO कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी, दुसरी घटना राजेंद्रनगर पोलिस स्टेशनची आहे, जिथे एका अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर थिएटरमध्ये बलात्कार केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें