‘पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात, ‘भाई का बड्डे’ तुरुंगात

'पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा', सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात, 'भाई का बड्डे' तुरुंगात
गुन्हेगाराच्या वाढदिवशी मित्रांची फेसबुक पोस्ट

'कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पुरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा' अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली (Pimpri Chinchwad Facebook Post Criminal)

अनिश बेंद्रे

|

May 21, 2021 | 8:32 AM

पिंपरी चिंचवड : सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त केलेली फेसबुक पोस्ट तिघा जणांना चांगलीच महागात पडली. ‘बडा धमाका होगा, पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’ अशी आरोळी ठोकणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. त्यामुळे ‘भाई का बड्डे’ आता तुरुंगात ‘साजरा’ होणार आहे. (Pune Crime Pimpri Chinchwad Three arrested for Facebook Post wishing Criminal)

काय होती फेसबुक पोस्ट?

अजय काळभोर या सराईत गुन्हेगाराचा बुधवारी वाढदिवस होता. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याच्या फेसबुक अकाऊण्टवरुन ‘कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पुरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’ अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली. सोमनाथ राजू देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता.

त्यानंतर अजय काळभोरचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही अजयला शुभेच्छा देताना ‘भाऊ आमचा, बाप तुमचा’ अशी फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला. अजय विलास काळभोर, प्रशांत सोनावणे आणि सोमनाथ राजू देवाडे अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पाहा फेसबुक पोस्ट

पुण्यात गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला बाईक रॅली

माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्याने त्याची हत्या केली होती. त्याच्या अंत्ययात्रेत जवळपास 150 ते 200 जणांनी सहभाग घेत दुचाकी रॅली काढली होती.

कोल्हापुरातील गुन्हेगाराच्या व्हिडीओने खळबळ

याआधी, इचलकरंजी शहरामध्ये पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी आकाश संजय वासुदेव (वय 27 रा. भोनेमाळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. दीपक कोळेकर खून प्रकरणातील संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश संजय हा व्हॉट्सअ‌ॅपवर स्टेटसद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. या खूनाच्या घटनेला वर्ष झाल्याच्या निमित्ताने आकाश वासुदेव याने व्हॉटस्अपवर ‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादाची तयारी सुरु’ अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटस् म्हणून ठेवला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ

(Pune Crime Pimpri Chinchwad Three arrested for Facebook Post wishing Criminal)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें