शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, पेपर सुरु असतानाच जेष्ठ शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

रायगडमध्ये (Raigad) शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलीये. परिक्षेचा (Exam) पेपर सुरु असतानाच एका जेष्ठ शिक्षकाने (Teacher) सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग (Minor Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, पेपर सुरु असतानाच जेष्ठ शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
Pali Police Station Raigad

रायगड : रायगडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलीये. परिक्षेचा (Exam) पेपर सुरु असतानाच एका जेष्ठ शिक्षकाने (Teacher) सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग (Minor Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगडमधील सुधागड तालुक्यातील पाली येथे ही घटना घडली. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाने यापूर्वीही विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

रायगड तालुक्यातील पाली येथील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतील जेष्ठ शिक्षकाने पेपर चालू असतानाच विनयभंग केला. याआधी देखील या शिक्षकाने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी या शिक्षकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, या विद्यार्थीनीचा गणित विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी या ज्येष्ठ शिक्षकाने तिचा विनयभंग केला. याआधी देखील त्याने असा प्रकार केला असल्याची तक्रार आहे. या प्रकरणानंतर पीडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी या शिक्षकाविरोधात पाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीये.

त्यानुसार, पाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 (अ)(1) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 9 (एफ)(एम), 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.

संबंधित बातम्या :

अडीच कोटींचं आमिष देवून पाच लाखांचा गंडा, पिंपात निघाली झेंडूची फुलं

Pune crime | घटस्फोटास नकार दिल्याने रागवलेल्या पतीने बुक्कीत पाडला पत्नीचा दात

Published On - 11:58 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI