रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, अवघ्या 12 तासात आरोपीला अटक

केवळ 12 तासात रायगड पोलिसांच्या वेगवेगळ्या आठ पथकांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Roha Rape And Murder Accused Arrested)

  • मेहबुब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 21:31 PM, 27 Jul 2020
रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, अवघ्या 12 तासात आरोपीला अटक

रायगड : रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संतापजनक घटनेनतंर केवळ 12 तासात रायगड पोलिसांच्या वेगवेगळ्या आठ पथकांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Roha Rape And Murder Accused Arrested)

रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली. रविवारी (26 जुलै) संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान मृत तरुणी शेतात काम करणाऱ्या आजोबांना आणण्यासाठी गेली होती. मात्र 8 वाजून गेल्यानंतरही ती घरी न आल्याने आई, वडील आणि घरातील मंडळींनी शोधाशोध सुरु केली.

यावेळी शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना स्कूटी उभी असलेली दिली. मात्र ती मुलगी दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेतला असता, वोवाळ्याच्या कोडं या ओहळ्याच्या मध्यभागी एका मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र आणि मृत असल्याचे आढळले.

यानंतर लगेचच कुटुंबियांनी रोहा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. या घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हा अधीक्षक सचिन गुजांळ, रोहा DYSP किरण सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी फॉरन्सिक लॅब आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाजवळ काही भौतिक पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर त्या मृत मुलीचे शव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

या गुन्ह्यांच्या तपासात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची आठ पथके बनवण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील संशयितांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी एका आरोपीने गुन्हा केल्याची कबूली दिली.

तसेच यात काही जणांचा सहभाग होता का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. पण अवघ्या 12 तासात एका आरोपीला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे मृत मुलीच्या घरी तसेच गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान सदरच्या घटनेचे वृत्त समजताच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच हे कृत्य करणार्‍या नराधमाला लवकरात लवकर अटक करा, त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना दिले होते. (Roha Rape And Murder Accused Arrested)

संबंधित बातम्या : 

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

विवाह्यबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप