लग्नाच्या तोंडावर दुसऱ्याच तरुणीसोबत पळाला, नवरदेवावर गुन्हा

नवरदेव पळून गेल्याची बातमी ऐकून वधूच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. बादलसोबत पळालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. आपल्या मुलीला बादल पळवून घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लग्नाच्या तोंडावर दुसऱ्याच तरुणीसोबत पळाला, नवरदेवावर गुन्हा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 4:20 PM

जयपूर : राजस्थानातील जोधपूरमध्ये लग्नाच्या 15 दिवस आधी नवरदेवाने आपल्या वधूला सोडून दुसऱ्या मुलीसोबत पळ काढला. नववधूच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्यासोबत पळालेल्या तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत पळून गेलेल्या तरुणीने त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास संमती दर्शवली. तर दुसरीकडे वधूच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

जोधपूरमध्ये रतनडाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीचा साखरपुडा तीन वर्षांपूर्वी बादल नायक याच्याशी झाला होता. येत्या 14 नोव्हेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार होते. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते. गेल्या 27 तारखेला लग्नाचे काही विधीही पार पडले. त्याचबरोबर वधूच्या कुटुंबातही लग्नाचे काही विधी सुरु होते. मात्र यावेळी बादल दुसऱ्याच मुलीसोबत पळून गेला.

नवरदेव पळून गेल्याची बातमी ऐकून वधूच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. बादलसोबत पळालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. आपल्या मुलीला बादल पळवून घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. दोघांना आर्य समाज मंदिरात लग्न करायचं होतं. मात्र त्याआधीच पोलिसांनी दोघांना शोधून काढलं. तरुणीने पोलिसांना सांगितलं की तिला आपल्या घरी जायचं आहे.

नवरदेवावर गुन्हा

लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे, खरेदीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे बादल आणि त्याच्या कुटुंबाने आमची फसवणूक केली, असा दावा पीडित नववधूने केला आहे. आरोपीच्या विरोधात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

नागपूरात कुख्यात गुंडाची दारुड्यांकडून दगडाने ठेचून हत्या

फेसबुकवरील मैत्री महागात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.