ल्युडो खेळताना जीव जडला, दीर-वहिनीचं लिव्ह इन रिलेशनशीप, आणि लग्नाच्या तोंडावर…

जोधपूरमध्ये राहणारी नीतू नावाची महिला ऑनलाईन लुडो खेळायची. तिचा दीर प्रवीणही तिच्यासोबत लुडो खेळायचा. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळताना दोघांची चांगलीच गट्टी जमली. हळूहळू त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.

ल्युडो खेळताना जीव जडला, दीर-वहिनीचं लिव्ह इन रिलेशनशीप, आणि लग्नाच्या तोंडावर...
प्रातिनिधीक फोटो

जयपूर : राजस्थानात एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळत आहे. ऑनलाईन ल्युडो गेम खेळताना एक महिला तिच्या दिराच्या प्रेमात पडली. दीर आणि वहिनी एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते, की दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. वहिनी पतीपासून विभक्त झाली आणि आपल्या दीरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. पण लग्नाच्या तोंडावर असं काही घडलं, की महिलेच्या आनंदावर विरजण पडलं. मराठी मालिकांच्या भाषेत बोलायचं, तर तिची ‘आई कुठे काय करते’मधील ‘संजना’ झाली.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडली. जोधपूरमध्ये राहणारी नीतू नावाची महिला ऑनलाईन लुडो खेळायची. तिचा दीर प्रवीणही तिच्यासोबत लुडो खेळायचा. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळताना दोघांची चांगलीच गट्टी जमली. हळूहळू त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. ते एकमेकांच्या प्रेमात इतके वाहवत गेले की अखेर त्यांनी घरातून पळून जाण्याचं ठरवलं.

लग्नाची जोरदार तयारी

दोघांनी एक घर भाड्याने घेतले आणि तिथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यायालयात नोंदणी करुन लग्नाची एक तारीख निश्चित करण्यात आली होती. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने तयारीही जोरदार सुरु होती. मात्र लग्न ऐन तोंडावर आलं आणि दीर प्रवीण अचानक गायब झाला. दुसऱ्या दिवशीही तो घरी परत न आल्यामुळे तो बेपत्ता झाल्याचं नीतूच्या लक्षात आलं.

कुटुंबीयांनी गायब केल्याचा दावा

नीतूने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रवीणच्या कुटुंबाने त्याला बेपत्ता केल्याचा दावा नीतूने केला आहे. मात्र त्याला त्याच्या घरच्यांनी गायब केलं, की तो स्वतःच पळून गेला, हा प्रश्न आहे. पोलिसांनी प्रवीणचा शोध सुरू केला आहे. नीतू आणि तिचा नवरा या दोघांमध्ये संबंध बरे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नीतू आणि तिचा नवरा जवळपास गेल्या 8 वर्षांपासून विभक्त झाले आहेत आणि नीतूने सांगितले आहे की तिला तिच्या पतीसोबत राहण्याची अजिबात इच्छा नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बिहारमध्ये तरुणीने एक्स बॉयफ्रेण्डला लुटलं

दुसरीकडे, दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या तरुणीनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने ती तरुणाला गंगेच्या घाटावर घेऊन गेली होती. तिथे तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला कारमध्ये बसवून शस्त्राच्या बळावर दागिने आणि मोबाईल फोन लुटला. तसेच त्याच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपयांची रक्कमही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर धमकी देऊन आरोपींनी युवकाला सोडून दिले. पीडित सनी दीपक उर्फ ​​कबीर याने पीरबाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाबी नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनीलाही आला राग, दोघांची रस्त्यावरच मारामारी, व्हिडीओ व्हायरल

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI