अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, चौकशीदरम्यान उपनगराध्यक्ष पोलीस ठाण्यातून पसार

अंबरनाथ महानगर पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, चौकशीदरम्यान उपनगराध्यक्ष पोलीस ठाण्यातून पसार
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 3:33 PM

अंबरनाथ : अंबरनाथ महानगर पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल (Ambarnath Former Upnagaradhyaksha Sunil Waghmare) करण्यात आला आहे. सुनील वाघमारे असं या माजी उपनगराध्यक्षाचं नाव आहे. अंबरनाथमधील आंबेडकर नगर भागातील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे (Ambarnath Former Upnagaradhyaksha Sunil Waghmare).

वाघमारे यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्याला मदत करण्याच्या हेतूनं घरी बोलावलं आणि आपल्यावर बलात्कार केला, असा महिलेचा आरोप आहे. तसेच, त्यानंतरही त्याने दोन वेळा या महिलेवर जबरदस्ती केल्याचंही महिलेने सांगितलं आहे. याबाबत पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सुनील वाघमारे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलं.

मात्र, त्यांना वाचवण्यासाठी भाजपच्या शहरातल्या मोठ्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात येत पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. मात्र, पीडितेने ठाम भूमिका घेत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

याच दरम्यान, भाजपच्या एका कार्यकर्त्याने वाघमारे यांना पोलीस ठाण्याबाहेर आणलं आणि संधीचा फायदा घेत सुनील वाघमारे हे पोलीस ठाण्यातून पळून गेले. वाघमारे यांना बाहेर बोलावून आणणाऱ्या या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यातून वाघमारे पळून गेल्याने त्याला भाजपने पळवले की पोलिसांनीच पळून जायला सांगितलं?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या पोलीस फरार सुनील वाघमारे यांचा शोध घेत आहेत.

Ambarnath Former Upnagaradhyaksha Sunil Waghmare

संबंधित बातम्या :

प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या

चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.