मुंबईत दुपटीने बलात्कार वाढले, RTI ची धक्कादायक माहिती

मुंबई: राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं. मुंबई पोलिसांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. एकीकडे असं चित्र असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांचा मुंबईवरील वचक सुटत चालला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत महिलांवरील अत्याचारात चार वर्षात दुपटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अत्याचार किंवा […]

मुंबईत दुपटीने बलात्कार वाढले, RTI ची धक्कादायक माहिती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई: राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं. मुंबई पोलिसांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. एकीकडे असं चित्र असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांचा मुंबईवरील वचक सुटत चालला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत महिलांवरील अत्याचारात चार वर्षात दुपटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अत्याचार किंवा बलात्काऱ्यांना मुंबई पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई पोलिसांनी आरटीआयमध्ये दिलेली माहिती धक्कादायक आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांना दिलेल्या माहितीत, 2013 च्या तुलनेत 2017 मध्ये बलात्काऱ्यांच्या घटनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाल्याचं नमूद आहे. तर 2018 मध्ये तब्बल 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

2013 पासून सप्टेंबर 2018 पर्यंत तब्बल 3817 बलात्कार गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 388 बलात्कार

2014 मध्ये एकूण 605 बलात्कार

2015 मध्ये एकूण 710 बलात्कार

2016 मध्ये एकूण 712 बलात्कार

2017 मध्ये एकूण 751 बलात्कार

2018 सप्टेंबरपर्यंत एकूण 651 बलात्कार

अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

2017 सप्टेंबरपासून डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 289 अल्पवयीन मुलींवर बलात्कार गुन्ह्यांची नोंद आहे.

2018 सप्टेंबरपर्यंत एकूण 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार गुन्ह्यांची नोंद

सप्टेंबर 2017 पूर्वीची माहिती मुख्य संगणक कक्षात उपलब्ध नाही

महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून अनेक कडक कायदे आहेत. मात्र तरीदेखील बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ अत्यंत चिंतेची बाब आहे. याबाबत प्रशासनांनी योग्य ते पाऊल लवकर उचलावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

“महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन गंभीर असून, योग्य ती कारवाई सतत केली जात आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक कायदे केले आहेत. आरटीआयमार्फत जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत  गुन्हे विभागातर्फे सखोल माहिती घेतल्यानंतर विधान केलं जाईल”, असं उत्तर मुंबई पोलिसांच्या संबंधित विभागातर्फे देण्यात आलं.

Non Stop LIVE Update
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.