याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
नवी मुंबईः रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याबाबत आता विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यांच्यावर कलम 354 ( अ ) च्या कलमाखाली गुन्ह्य दाखल असल्याचंही समजतंय. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. (Renu Sharma Lawyer Charged With Molestation; Problems Will Increase?)
तक्रारदार महिला रेणू शर्मा (Renu sharma) यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला आज (14 जानेवारी) भेट दिली होती. यावेळी त्यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोर जबाब नोंदविला. यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील अॅड. रमेश त्रिपाठी उपस्थित होते. पण आता रमेश त्रिपाठींवरच विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रेणू शर्मांबरोबरच आता त्यांचे वकील रमेश त्रिपाठींच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रमेश त्रिपाठी हे भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी; पण भाजपने हात झटकले
रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी हे भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या नावाचे चौकीदार रमेश त्रिपाठी असे फेसबुक पेजसुद्धा दिसत आहे. रमेश त्रिपाठी यांचे वाशी येथील 17 प्लाझा याठिकाणी कार्यालय असल्याची सुद्धा माहिती मिळालीय. पण नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी ते भाजपचे पदाधिकारी नसल्याचं सांगितलं. त्यामुळे रमेश त्रिपाठी नक्की कोण? हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
संबंधित बातम्या
तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी धनंजय मुंडेंच्या जवळच्या; तक्रारदार महिलेच्या वकिलाचा गंभीर आरोप
Renu Sharma Lawyer Charged With Molestation; Problems Will Increase?