कांद्यावर दरोडेखोरांची नजर, बिहारमध्ये 51 क्विंटल कांद्याचा ट्रक लुटला

बिहारमध्ये कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने दरोडेखोरांनी थेट कांद्याचा ट्रक लुटला (Robbery of onion in bihar) आहे. ही घटना बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया येथे घडली.

कांद्यावर दरोडेखोरांची नजर, बिहारमध्ये 51 क्विंटल कांद्याचा ट्रक लुटला
Follow us
| Updated on: Dec 28, 2019 | 8:31 PM

पाटणा : बिहारमध्ये कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने दरोडेखोरांनी थेट कांद्याचा ट्रक लुटला (Robbery of onion in bihar) आहे. ही घटना बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया येथे घडली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंद केला असून अधिक तपास (Robbery of onion in bihar) करत आहेत.

दरोडेखोरांनी ट्रकमधील तब्बल 102 गोण्या लुटल्या आहेत. एकूण 51 क्विटंल कांदा लुटल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या एक मिहन्यांपासून बिहारमध्ये कांद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कांदा 100 किलोपर्यंत पोहोचला आहे. कांद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे येथील नागिरक त्रस्त आहेत. तसेच दरोडेखोरांची नजरही कांद्यावर आहे. गेल्या काही दिवसात दरोडेखोरांनी कांदा आणि लसून चोरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

इलाहाबाद (प्रयागराज) वरुन जहानाबाद येथे 102 गोणी (51 क्विटंल) कांदे घेऊन जात होतो. याच दरम्यान काही हत्यार असलेल्या दरोडेखोरांनी मोहनियामध्ये मला अडवले आणि जवळपास चार तास मला फिरवत होते. तसेच सर्व कांदाही लुटला, असं ट्रक चालक देशराजने पोलिसांना सांगितले.

ट्रकमधील सर्व कांदा लुटल्यानंतर आरोपींनी रात्री दोन वाजता घटनास्थळावरुन किमान पाच किलोमीटरच्या अंतरावरती सोडले. ट्रकमधील सर्व गोण्याही त्यांनी लुटल्या होत्या. देशराज उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यात राहणार असल्याचे म्हटलं जात आहे.

यापूर्वीही डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कैमूर जिल्ह्यात दरोडेखोरांनी एका वाहनातील 1 हजार 920 किलो लसून लुटला होता. या घटनेचा गुन्हाही पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला होता. पण आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.