सांगलीतल्या खंडणीखोर गुंडांची पोलिसांकडून भर रस्त्यावरुन धिंड

सांगली : खंडणीची मागणी करत व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली. सोनम बाळू शिंदे, मुज्ज्मिल शेख, नितीन पालकर आणि जयेश माने अशी या गुंडांची नावं असून, या गुंडांना पोलिसांनी शुक्रवारी  घटनास्थळावर नेलं आणि शहराच्या प्रमुख मार्गावरुन धिंड काढली.  या गुंडांची धिंड पाहण्यासाठी इस्लामपूर शहरात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे काही […]

सांगलीतल्या खंडणीखोर गुंडांची पोलिसांकडून भर रस्त्यावरुन धिंड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

सांगली : खंडणीची मागणी करत व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली. सोनम बाळू शिंदे, मुज्ज्मिल शेख, नितीन पालकर आणि जयेश माने अशी या गुंडांची नावं असून, या गुंडांना पोलिसांनी शुक्रवारी  घटनास्थळावर नेलं आणि शहराच्या प्रमुख मार्गावरुन धिंड काढली.  या गुंडांची धिंड पाहण्यासाठी इस्लामपूर शहरात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडीही झाली होती.

व्यावसायिक जितेंद्र परदेशी याना 15 जानेवारी रोजी गुंड सोनम  शिंदे, मुज्ज्मिल शेख, नितीन पालकर आणि जयेश माने यांनी  शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर परदेशींवर कोयत्याने वार केले होते. परदेशी यांनी स्वसंरक्षणासाठी गुंड सोनमच्या हातातील कोयते हिसकावून घेतला आणि पायावर वार केला.

या घटनेनंतर इस्लामपूर पोलिसांनी चारही गुंडांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर घटनास्थळी नेऊन त्यांची धिंडही काढली.

दरम्यान, धिंड काढलेल्या गुंडांची इस्लामपूरमधील अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त करुन टाकली आहेत. इस्लामपूर येथील झेंडा चौक येथे या चार गुंडांनी बेकायदेशीरपणे शेड टाकली होती आणि तिथून हे गुंडगिरी करत लोकांना त्रास देत असत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.