खासदार मोहन डेलकर यांच्या 15 पानांच्या सुसाईड नोटमधून अनेक गौप्यस्फोट

ही सुसाईड नोट 15 पानांची असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 20:04 PM, 23 Feb 2021
खासदार मोहन डेलकर यांच्या 15 पानांच्या सुसाईड नोटमधून अनेक गौप्यस्फोट
MP Mohan Delkar's 15-page suicide note

मुंबईः दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केलीय. मृत खासदार मोहन डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. ही सुसाईड नोट 15 पानांची असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. (Several leaks from MP Mohan Delkar’s 15-page suicide note)

मोहन डेलकरांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या 15 पानी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांनी काल मुंबईत आत्महत्या केली. मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. ही नोट सुमारे 15 पानांची आहे. यात त्यांनी आपल्या आत्महत्येबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू झालाय. या तपासासाठी पोलीसांनी एका विशेष पथकाची स्थापना केलीय. पोलीस सर्व अंगाने या घटनेचा तपास करीत आहेत.

डेलकर खासदार असल्याने केंद्रीय यंत्रणेकडूनही तपास

दरम्यान, मोहन डेलकर यांचा तात्काळ पोस्ट मार्टेम करण्यात आलाय. यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. काल घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने तपासणी केली. डेलकर खासदार असल्याने केंद्रीय यंत्रणाही याचा तपास करीत आहे. कालच घटना घडली असल्याने आणि नातेवाईक डेलकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तसेच डेलकर मुंबईत आल्यावर त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होते. यांचाही अजून जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

लवकरच त्या सर्वांचा जबाब नोंदवला जाणार

लवकरच या सर्वांचा जबाब नोंदवला जाईल, असे मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डेलकर यांच्या मृतदेहावर काल पोस्ट मार्टेम करण्यात आल्यावर काही गोष्टी समोर आल्यात. डेलकर यांच्या मृत्यूबाबत दुपारी दोन वाजता पोलिसांना कळालं. मात्र, त्यांनी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याचं पोस्ट मार्टेमच्या प्राथमिक तपासात उघडकीस आलं.

संबंधित बातम्या  

खासदार मोहन डेलकर आत्महत्येचं गूढ वाढलं; सुसाईड नोटमध्ये काय?

तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Several leaks from MP Mohan Delkar’s 15-page suicide note