सिंधुदुर्ग: जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. 354 कलमांतर्गत ओरोस पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. मागील 2 महिन्यांपासून डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत नमूद केलंय. (Sindhudurg District Hospital Surgeon Dr. Shrimant Chavancase of molestation)
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची ओपीडीसमोर केबिन आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या केबिनच्या बाहेरील बाजूला महिला सुरक्षा तैनात असतात. ही कंत्राटी महिलाही तिकडेच कर्तव्याला असायची. श्रीमंत चव्हाण वारंवार त्या महिलेला कॅबिनमध्ये बोलावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते.
श्रीमंत चव्हाण यांनी सुमारे आज सायंकाळी 4.00 वाजता बेल मारून त्या कंत्राटी महिलेला कॅबिनमध्ये बोलावले. त्यानंतर जवळ बोलावून तिचा हात हातात घेऊन तू मला आवडतेस, मी जे काही वागतो ते कोणाला सांगू नकोस, असे ते डॉक्टर त्या महिलेला सांगू लागले.
तसेच माझी तक्रार केल्यास तुला नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी त्या डॉक्टरांनी महिलेला दिल्याची महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे अश्लील चाळे आणि छळाला कंटाळून अखेर त्या महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या
चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागलेल्या पीडितेची तक्रार, 2 आरोपींवर बलात्काराचा गुन्हा
खासदार मोहन डेलकर आत्महत्येचं गूढ वाढलं; सुसाईड नोटमध्ये काय?
Sindhudurg District Hospital Surgeon Dr. Shrimant Chavan case of molestation