वडील पुतण्याकडे वास्तूशांतीसाठी, संधी साधत दारुड्या मुलाकडून आईचा खून

दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली (Son Killed Mother In Jalna) आहे.

वडील पुतण्याकडे वास्तूशांतीसाठी, संधी साधत दारुड्या मुलाकडून आईचा खून
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 9:17 PM

जालना : दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या आरोपीने स्वत: घटनेची माहिती फोन करुन मामाला दिली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लालवाडी शिवारात ही घटना घडली आहे. (Son Killed Mother In Jalna)

यानंतर आरोपी मुलाने घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदनापूर तालुक्यातील लालवाडी येथील  राहणारे आरोपीचे वडील भागचंद दगडू बारवाल (65) हे गुरुवारी रात्री आपल्या पुतण्याच्या घरी वास्तूशांतीसाठी गेले होते. वडील घरी नाही ही संधी साधत दारुडा मुलगा गोपीचंद बारवाल (35) याने आई अन्साबाई बारवाल (60) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अन्साबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यानंतर माथेफिरु मुलगा गोपीचंद बारवाल याने स्वतः मामाला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह इतर सर्वजण तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी गोपीचंद भागचंद बारवाल संयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. या आरोपीला पकडल्यानंतर त्याने हा खून नेमका का केला याचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून स्पष्ट होईल.  (Son Killed Mother In Jalna)

संबंधित बातम्या : 

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.