रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

बोठे आणि हनी ट्रॅपचा नेमका काय आहे संबंध जाणून घेऊयात. Strong Connection Of Bothe And Honey Trap In Rekha Jare Murder

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 17:08 PM, 9 Dec 2020
रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आता बोठे आणि हनी ट्रॅप या प्रकरणाची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. पण बोठे आणि हनी ट्रॅपचा नेमका काय आहे संबंध जाणून घेऊयात. (Strong Connection Of Bothe And Honey Trap In Rekha Jare Murder)

अहमदनगरला यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी जिल्ह्याभरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. त्यात सर्वात जास्त हनी ट्रॅपसंदर्भात चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरू केली होती. त्यातून अनेक मोठंमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल.

सुरुवातीला एखादा प्रतिष्ठित पुरुष हेरला जात असे, त्याला महिलेमार्फत मिस कॉल दिला जात होता, नंतर त्याचा रिटर्न कॉल आल्यानंतर चुकून हा कॉल लागला, असे ती महिला सांगत असे. मात्र यावेळी बोलताना इतरही विचारपूस करून त्या व्यक्तीशी जवळीक वाढवत असे किंवा इतर मार्गाने प्रतिष्ठित पुरुषांशी संपर्क करून जवळीक साधली जायची. तो जाळ्यात अडकल्यानंतर त्याला फसून ब्लॅकमेलिंग केलं जात होते.

मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर यात काही हस्तक्षेप नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर शहरात याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने पोलिसांचे म्हणणे ऐकले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात 11 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सध्या बोठेला शोधण्यासाठी विविध पथके रवाना

गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोठे याने न्यायालयात अॅड. महेश तवले यांच्या माध्यमातून सोमवारी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन अर्जावर सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले. म्हणणे आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. सध्या बोठेला शोधण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे याला कोण मदत करू शकते, याचा अंदाज घेत पोलिसांनी त्याच्या मित्र आणि जवळच्या व्यक्तींवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बोठे पकडल्यानंतर अनेक प्रकरणे समोर येणार आहेत.

Strong Connection Of Bothe And Honey Trap In Rekha Jare Murder

संबंधित बातम्या :

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक