कासवाचा 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, ठाण्यात मालकावर गुन्हा

ठाण्यातील कोरल हायराईज हेव्हन बिल्डिंगमधील 20 व्या मजल्यावरुन पडून कासवाचा 1 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता (Thane Tortoise Turtle Dies )

कासवाचा 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, ठाण्यात मालकावर गुन्हा
Representative Image
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:56 AM

मुंबई : इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन पडून कासवाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणीमित्राच्या तक्रारीनंतर कासव पाळणाऱ्या मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. मयत कासवाचे फोटो पाहून दोन एनजीओंनी कासव मालक प्रतीक चोरे यांच्याविरोधात तक्रार केली होती. (Thane Tortoise Turtle Dies after falling from 20th Floor FIR against Owner)

ठाणे शहरातील बहुमजली इमारतीच्या घरातून पाळीव कासव खाली पडून मृत्युमुखी पडल्याबद्दल कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीविरोधात प्राण्याविरोधी क्रौर्य प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल केला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

NGO च्या तक्रारीनंतर कासव मालकावर गुन्हा

ठाण्यातील बाळकुम-माजिवडा भागातील कोरल हायराईज हेव्हन बिल्डिंगमधील 20 व्या मजल्यावरुन 1 मे 2021 रोजी पडून कासवाचा मृत्यू झाला होता. दोन एनजीओंनी केलेल्या तक्रारीनंतर कासव मालक प्रतीक उत्तम चोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी सांगितले की अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पीएडब्ल्यूएस) या एनजीओंच्या कार्यालयांना मृत पाळीव कासवाबद्दल छायाचित्रांसह माहिती मिळाली होती.

तक्रारदार भारतीय पशु कल्याण मंडळाचे बोनरी अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर सुनील सुब्रमण्यम कुंजू यांनी झोन 5 चे पोलिस उपायुक्त, वर्तक नगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना अधिकृत लेखी तक्रार दिली होती.

इमारतीतील रहिवाशांची तक्रार

तक्रारदार कुंजू यांना 1 मे रोजी त्याच इमारतीतील एका रहिवाशाचा फोन आला होता. कासवाच्या मृत्यूनंतर मालकाने त्याचा मृतदेह उचलण्याचे सौजन्यही दाखवले नाही, अशी माहिती रहिवाशांनी दिली होती. त्यामुळे कासवाच्या मृतदेहाची सफाई कर्मचारी आणि सोसायटीच्या वॉचमनने विल्हेवाट लावली होती. (Thane Tortoise Turtle Dies )

आंघोळीनंतर कासव खिडकीतून पडल्याचा दावा

“कासव मालक म्हणाला की त्याने कासवाला धुवून आपल्या फ्रेंच विंडोजवळ ठेवले होते, जिथून ते खाली पडले” असे कपूरबावाडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कासव पाळणाऱ्या मालकावर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू अॅनिमल्स अॅक्ट 1960 अंतर्गत कापुरबावडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक, 23.5 लाख लुटणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

दरोडेखोराला पळवण्यासाठी वडिलांसह कुटुंब एकवटलं, पुण्यात पोलिसांच्या गाडीला भररस्त्यात धडका

(Thane Tortoise Turtle Dies after falling from 20th Floor FIR against Owner)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.