धुळ्यात चावीवाल्याची हातचलाखी, तिजोरीतील एक लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

शिरपूर तालुक्यात चावी तयार करण्यास आलेल्या चावीवल्याने हातचलाखी करत एक लाख रुपये पळवल्याचा प्रकार समोर आला आहे (Thief stolen jewelery of One lakh rupees in Dhule)

धुळ्यात चावीवाल्याची हातचलाखी, तिजोरीतील एक लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 6:32 PM

धुळे : तिजोरीची चावी हरवणं कधी-कधी चांगलंच महागात पडू शकतं. शिरपूर तालुक्यात चावी तयार करण्यास आलेल्या चावीवल्याने हातचलाखी करत एक लाख रुपये पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी गावात हा प्रकार घडला आहे. या चोरीबद्दल तक्रार दाखल करताच अवघ्या 24 तासात पोलिसांनी चोरट्याला गजाआड केले. (Thief stolen jewelery of One lakh rupees in Dhule)

न्यू बोराडी गावात 17 सप्टेंबरला एक अज्ञात 17 वर्षीय चावीवाला शिकाय पावरा यांच्या घरी आला. घरातील लोखंडी कपाटाची व लॉकरची चावी हरवली म्हणून पावरा यांनी त्याला बोलावले. लॉकरमध्ये वडीलोपार्जीत आणि नव्याने घेतलेले सुमारे चांदीचे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे दागिने ठेवले होते. हेच दागिने चावीवाल्याने पळवल्याची घटना घडली.

चावी बनवत असताना तिजोरीतील दागिने भामट्या चावीवाल्याच्या नजरेत भरले. योग्य संधीच्या शोधात असताना घरमलक बाहेर जाताच चावीवाल्याने सगळे दागिने त्याचा बॅगमध्ये भरुन ठेवले. ‘माझ्याकडे दुसरे हत्यार किंवा साहित्य नाही. मी उद्या येऊन चावी बनवून देईन’ असे सांगून चावीवाला पळून गेला. बरेच दिवस झाले तरी चावीवाली परत न आल्याने पावरा यांच्या मनात शंकेची पाल चूकचूकली.त्यांनी तिजोरी खोलून पाहिली. तिजोरी खोलताच दागिने गायब असल्याचे त्यांना कळाले. नंतर या चोरीनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

अवघ्या चोवीस तासांत आरोपीला बेड्या

दागिने चोरी गेल्याचे कळताच शिकाय पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीसस्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचा कसून तपास करत अवघ्या चोवीस तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. परिसरातील दुकानदारांकडून माहिती घेतली. तसेच प्रकरणाच्या खोलात जाऊन शोध घेताना पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांचीही मदत घेतली. चावीवाल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. प्रवीणसिंग जीवनसिंग खबीर (वय 17) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, हा चोरीचा प्रकार घडल्याने, आपण घरात कुणाला बोलवतो? ती व्यक्ती विश्वसनीय आहे का? याची खात्री करुन घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक

ATM Money Theft | बनावट एटीएम कार्डच्या सहाय्याने चोरी, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड

Powai Theft | पवईच्या हिरानंदानीत एका रात्रीत तीन फ्लॅटमध्ये चोरी

(Thief stolen jewelery of One lakh rupees in Dhule)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.