विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींना अटक

महाविद्यालयीन तरुणांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 20 किलो गांजा हस्तगत केला असून, आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींना अटक
गांजा विकणाऱ्या तीन आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 5:38 PM

कल्याण : महाविद्यालयीन तरुणांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक (Three accused arrested) करण्यात आली आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 20 किलो गांजा हस्तगत (20 kg of cannabis seized)केला असून, आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांना एक व्यक्ती गांजा घेऊन डोबिवलीमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचण्यात आला. एक तरुण दोन पोती घेऊन शिवम हॉटेल परिसरात येताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याजवळील पोत्यात 20 किलो गांजा  आढळून आला. तपासादरम्यान आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आनंद देवकर, रेहमल पावरा आणि संदीप पावरा असे या प्रकरणातील आरोपींचे नावे आहेत.

सापळा रचून आरोपीला अटक

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक जण डोंबिवलीमध्ये गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हा तरुण गांजा घेऊन येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन पोत्यामधील वीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आनंद देवकर असे या तरुणाचे नाव आहे. तो डोंबिवलीमधील शिव मंदिर परिसरात राहातो. आपन हा गांजा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून आणल्याची कबुली देवकर याने पोलिसांना दिली. देवकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट शिरपूर गाठले. पोलिसांनी शिरपूरमधून याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. रेहमल पावरा आणि संदीप पावरा असे या आरोपींचे नावे आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर एका जंगलात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांची देखील चौकशी होणार

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता, आरोपींना 31 जानेवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आनंद देवकर हा शिरपूर येथून गांजा घेऊन, तो डोबिवलीमधील महाविद्यालयीन तरुणांना विकायचा. अनेक मुले हा गांजा विकत घेऊन नशा करायचे. दरम्यान आता याप्रकरणात गांजा खरेदी करणाऱ्या तरुणांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

नोकरीवर घ्या नाही तर आत्महत्या करतो, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल!

Delhi Gang Rape | 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, केस कापून काढली धिंड, दिल्ली हादरली

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.