मांडूळ प्रजातीचे तीन दुर्मीळ साप बाळगणार्‍या दोघांना अटक; नेमकी अंधश्रद्धा काय?

वनविभागाचे अधिकारी आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत त्यांना अटक केलीय.

  • प्रवीण चव्हाण, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 17:02 PM, 20 Jan 2021
मांडूळ प्रजातीचे तीन दुर्मीळ साप बाळगणार्‍या दोघांना अटक; नेमकी अंधश्रद्धा काय?

पालघर: जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबोली गावच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ हॉटेल अपोलो समोर मांडूळ प्रजातीच्या तीन सापांची (वन्यजीव) तस्करी करताना दोघांना अटक करण्यात आलीय. दोन व्यक्ती हे मांडूळ जातीचे साप औषधी पदार्थ आणि काळ्या जादूसाठी विक्रीस घेऊन जात असतानाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. वनविभागाचे अधिकारी आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत त्यांना अटक केलीय. (Two Arrested For Possessing Three Rare Snakes Of The Forehead Species)

दोन व्यक्ती मांडूळ प्रजातीचे 2 दुर्मीळ साप घेऊन जात असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यांनी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत संयुक्तरीत्या कारवाई करून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले, त्यांच्याविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 (3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आलीय.

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत

आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मीळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोघा आरोपींकडून दोन जिवंत मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले असून, या मांडूळांची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेला ही गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली होती. जालन्यातील सेनगाव तालुक्यातील जहागीर आणि सरकळी गावातील सतीश कांबळे आणि दत्ताराव साठे हे मांडूळांची तस्करी करण्यासाठी मांडूळ जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली असता काळ्या रंगाचे मांडूळ त्यांना आढळून आले. दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

संबंधित बातम्या

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत, का होते तस्करी?, काय आहेत अंधश्रद्धा?

two Arrested For Possessing Three Rare Snakes Of The Forehead Species